Tuesday, February 27, 2024

Latest Posts

Happy birthday  ; भाईजानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तुफान गर्दी

बॉलिवूडचा भाईजान म्हणुन ओळख निर्माण करणारा सलमान खान आज आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे.

बॉलिवूडचा भाईजान म्हणुन ओळख निर्माण करणारा सलमान खान आज आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे.त्याच्या या आजपर्यंतच्या प्रवासात त्याने जोमाने आणि जिद्दिने काम करत प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवलं आहे.सलमानचे चाहते केवळ भारतापुरतेच मर्यादित नसून जगाच्या कानाकोपऱ्यात आहेत. त्यामुळेच त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते जीवाचे रान करतात.

दरम्यान मध्यरात्री सलमान खानने जवळचे मित्र-मंडळी आणि कुटुंबियांसोबत आपला वाढदिवस मध्यरात्री साजरा केला आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशातच आज सकाळपासून भाईजानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर तुफान गर्दी केली आहे. सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. त्यामुळे पोलीसांचा बंदोबस्त त्याचबरोबर बॅरिकेट्सदेखील लावले आहेत. भाईजानचा मोठा चाहतावर्ग असून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहते गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ येत असतात.दरम्यान फक्त मुंबईचेच चाहते नाही तर  मुंबई बाहेरचे अनेक चाहतेही येत असतात. 

सुपरस्टार सलमान खानचा बर्थडे सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सलमान खान एकीकडे आपला 58 वा वाढदिवस साजरा करत आहे. तर दुसरीकडे त्याचा भाचा आयतचादेखील आज वाढदिवस आहे. त्यामुळे माचा आणि भाचा यांनी एकत्र येत आपला वाढदिवस साजरा केला आहे. अर्पिता खान आणि आयुष शर्मा यांच्या चेहऱ्यावर सेलिब्रेशनचा आनंद स्पष्ट दिसत आहे. सोशल मीडियावर केक कटिंग सेरेमनीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.सलमानच्या वाढदिवसाला अरबाज खान त्याचा मुलगा अरहान खान, यूलिया वंतूर, हेलेन, अलवीरा खान अग्निहोत्री आणि बॉबी देओलसह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सोशल मीडियावर सध्या हॅश टॅग सलमान खान ट्रेंड करत आहे. सलमान खान आज आपल्या आगामी प्रोजेक्टची घोषणा करू शकतो.तर चाहते सलमान नव्या प्रोजेक्टची घोषणा करणार यासाठी  आतुर आहेत.

सलमान गेली ३ दशके सिनेइंडस्ट्रीवर राज्य करत आहे.दरम्यान सलमान आज जरी ५८ वर्षांचा झाला असला तरी त्याचा फिटनेस आणि लूक नेहमीच चर्चेत असतो.भाईजान, दबंग खान, यारों का यार, सल्लू, चुलबूल पांडे अशा अनेक नावांनी सलमान खान ओळखला जातो. सलमान सध्या ‘बिग बॉस’ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. सलमान खानने 1988 साली बीवी हो तो ऐसी या हिंदी चित्रपटातील छोटेखानी भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण केले .1989 साली सलमानाने प्रमुख नायकाची भूमिका साकारलेल्या मैने प्यार किया या हिंदी चित्रपटाने प्रचंड व्यावसायिक यश कमवले आणि त्याच्या करिअरला या चित्रपटामुळे टर्निंग पॉंईन्ट मिळाला तो आजतगत तसाचं राहिला आहे. दरम्यान सलमान आता किक २ , नो एंट्री या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तसचं त्याचा टायगर ३ या चित्रपटाला देखील प्रेक्षकांनी चांगलाचं प्रतिसाद दिला आहे.सलमानच्या यशस्वी कारकिर्दीतील भूमिकेमुळे तो लाखो चाहत्यांचा मनाचा भाईजान बनला आहे.

हे ही वाचा:

निकालापूर्वी भाष्य करणे म्हणजे निवडणूक आयोगावर दबाव टाकण्यासारखे – आमदार जितेंद्र आव्हाड

मी दीक्षाभूमीच्या शहरातून आहे, याचा मला आनंद वाटतोय- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss