Sunday, March 3, 2024

Latest Posts

मी दीक्षाभूमीच्या शहरातून आहे, याचा मला आनंद वाटतोय- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे. जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून देवेंद्र फडणवीसांचा गौरव करण्यात आला. विशेष म्हणजे कोयासन विद्यापीठातर्फे पदवी मिळवणारे देवेंद्र फडणवीस पहिले उपमुख्यमंत्री आहेत. डॉक्टरेट पदवी मिळणं हे माझं भाग्य आहे, असे मत यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. गौतम बुद्ध आणि त्यांचे विचार ही अशी साखळी आहे, जी दोन देशांना एकत्र करते. देशाला युद्धाची नाही, बुद्धाची गरज आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साकारलेल्या संविधानामुळे संधीची समानता मिळाली.

मी दीक्षाभूमीच्या शहरातून आहे, याचा मला आनंद आहे. जपानने नेहमीच महाराष्ट्राला मदत केली आहे. मुंबईतील पायाभूत सुविधांसाठी जपानचा मोठा वाटा आहे. महाराष्ट्राच्या जनतेची आणि माझ्या सहकाऱ्यांची साथ असल्यामुळे मला हा गौरव मिळाला आहे. या गौरवाचे श्रेय मी माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला देतो, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. 

 

Latest Posts

Don't Miss