Friday, May 17, 2024

Latest Posts

‘शमशेराची’ पहिल्या दिवशीची कमाई, रणबीर ने केली चाहत्यांची निराशा

शमशेराबद्दल अशी अपेक्षा होती की हा या वर्षातील सर्वात हिट चित्रपट ठरेल. बिग बजेट चित्रपट, निर्माता आदित्य चोप्रानेयशराज बॅनरखाली बनवलेला त्यांचा 'शमशेरा' रिलीज करण्यासाठी पूर्ण ताकद लावली.

मुंबई : रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. पण हे कलेक्शन तितकेसे चांगले नाहीए.रणबीर कपूर, संजय दत्त आणि वाणी कपूर यांचा चित्रपट ‘शमशेरा’ प्रदर्शित झाला. या चित्रपटातून रणबीर कपूरने 4 वर्षांनी कमबॅक केले आहे. शमशेराबद्दल अशी अपेक्षा होती की हा या वर्षातील सर्वात हिट चित्रपट ठरेल. बिग बजेट चित्रपट, निर्माता आदित्यचोप्राने यशराज बॅनरखाली बनवलेला त्यांचा ‘शमशेरा’ रिलीज करण्यासाठी पूर्ण ताकद लावली. चित्रपटाच्या प्रमोशनपासून ते स्क्रीनकाउंटपर्यंत सर्व गोष्टींवर नजर ठेवण्यात आली होती. कलाकार अनेक शहरांमध्ये प्रमोशनसाठी गेले होते, तेव्हा हा चित्रपट ४३५० स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला आहे, असे असूनही ‘शमशेरा’ सिनेमाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी फारशी कामाई केली नाही.

हेही वाचा.

विजय देवरकोंडाने वापरली नवी शिक्कल, LIGER सिनेमाच्या ट्रेलर लाँच वेळेस सगळ्यांना आश्चर्याचा धक्का

‘शमशेरा’ने पहिल्याच दिवशी किती कोटींची कमाई केली?

रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ 10 कोटींचा गल्ला केला आहे, जो अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. सूत्रांनीदिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या निर्मितीसाठी 150 कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे, त्यामुळे पहिल्या दिवसाची कमाईपाहता निर्मातेही नाराज आहेत. ‘शमशेरा’ 4 हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. चित्रपटाचे 150 कोटींचे बजेट बघितले तर हाआकडा 10 टक्‍क्‍यांपर्यंतही जाईल असे वाटत नाही. यामुळे शमशेराचा पुढचा आठवडा जरा कठीण जाणार आहे.

‘भूल भुलैया’ 2 ला देखील मागे सोडू शकला नाही.

रणबीर कपूरचा शमशेरा हा कोरोना नंतरचा दुसरा सर्वात मोठा रिलीज आहे. हा चित्रपट 4000 स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. शमशेराबद्दल बोलायचे झाले तर याचे दिग्दर्शन करण मल्होत्राने केले आहे. या चित्रपटात संजय दत्तची नकारात्मक भूमिका आहे. आपल्या अभिनयाने तो पुन्हा एकदा रसिकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया 2’ या चित्रपटानेपहिल्याच दिवशी 14 कोटींचा व्यवसाय केला. नुकताच प्रदर्शित झालेला एकही चित्रपट या चित्रपटाच्या ओपनिंग डे कलेक्शनला मागेटाकू शकला नाही.

Latest Posts

Don't Miss