आज Sulochana Didi यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार

देशभरामध्ये मराठी चित्रपट गाजवणाऱ्या मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर(Sulochana Latkar) यांचे रविवार दिनांक ४ जून २०२३ रोजी निधन झाले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुलोचना दीदींनी दादर मधील खासगी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आज Sulochana Didi यांच्या पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार

देशभरामध्ये मराठी चित्रपट गाजवणाऱ्या मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर(Sulochana Latkar) यांचे रविवार दिनांक ४ जून २०२३ रोजी निधन झाले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सुलोचना दीदींनी दादर मधील खासगी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलोचना दीदींनी दादर मधील खासगी रुग्णालयामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही महिन्यांपासून सुलोचना श्वसनाशी संबंधित संसर्गामुळे त्या आजारी होत्या. त्यांच्यावर बऱ्याच दिवसनपासून उपचार सुरू होते. अखेर काल त्याच्यावर उपचार सुरु असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आज सकाळी प्रभादेवी येथील राहत्या घरी सुलोचना दीदी यांचे पार्थिव सकाळी ११ वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी ११ ते ४ या वेळेत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यानंतर सायंकाळी ५ नंतर शिवाजी पार्क (Shivaji Park) येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सुलोचना दीदी यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे अशा सुचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्या आहेत.

सुलोचना दीदी यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील एका पर्वाचा अंत झाला आहे. सुलोचना लाटकर यांना सुलोचना दीदी असे सर्व म्हणायचे. मराठी आणि हिंदी मिळून त्यांनी ४०० हून अधिक सिनेमांत काम केलं आहे. सुलोचना दीदी या विशेषतः ‘आई’च्या भूमिकेसाठी ओळखल्या जात. दीदींनी सोज्वळ, शांत आणि प्रेमळ आई पडद्यावर उत्तमपणे उमटली. सुलोचना दीदींचे ‘वहिनीच्या बांगड्या’, ‘मीठ भाकर’, ‘धाकटी जाऊ’ हे चित्रपट १९५३-५४ मध्ये प्रचंड गाजले. त्यानंतर दीदींनी कधी मागे वळून पाहिले नाही. ‘सांगत्ये ऐका’, ‘मोलकरीण’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘साधी माणसं’, ‘एकटी’ हे सुलोचना दीदींच्या कारकीर्दीतील अजरामर सिनेमे ठरले. मराठी सिनेसृष्टी गाजवल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीतही सुलोचना दीदींनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

हे ही वाचा:

World Bycycle Day का आणि कधी साजरा केला जातो? वाचा सविस्तर…

‘या’ ५ संकल्पांचे करा पालन आणि World Enviroment Day 2023 करा साजरा…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version