Friday, April 26, 2024

Latest Posts

‘या’ ५ संकल्पांचे करा पालन आणि World Enviroment Day 2023 करा साजरा…

पर्यावरण हे प्रत्येक सजीवासाठी खूप महत्वाचे आहे. प्रत्येक सजीवाचे जीवन हे पर्यावरणामुळेच शक्य आहे. म्हणूनच पृथ्वीच्या संरक्षण, संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी ५ जून हा दिवस जगभरात जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो.

पर्यावरण हे प्रत्येक सजीवासाठी खूप महत्वाचे आहे. प्रत्येक सजीवाचे जीवन हे पर्यावरणामुळेच शक्य आहे. म्हणूनच पृथ्वीच्या संरक्षण, संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी ५ जून हा दिवस जगभरात जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा निश्चय हा १९७२ मध्ये स्टॉकहोम येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवी पर्यावरण परिषदेत झाला.

पर्यावरण हे आपल्यासाठी तसेच आपल्या भविष्यासाठी फार महत्वाचे आहे. म्हणूनच जागतिक पर्यावरण दिन जागतिक पातळीवर साजरा करतात. जागतिक पर्यावरण दिन जगभरात दरवर्षी ५ जून रोजी साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस साजरा करण्यासाठी सयुंक्त राष्ट्रांद्वारे विशिष्ट थीम ठरवली जाते.संयुक्त राष्ट्रांद्वारे ‘जागतिक पर्यावरण दिन २०२३’ ची थीम “बीट प्लास्टिक प्रदूषण” (#BeatPlasticPollution) ही ठेवण्यात आली आहे.

निसर्ग आपल्याला जगण्यासाठी खूप काही देतो पण त्या बदल्यात आपण निसर्गाचे शोषण करतो. तसेच पर्यावरणाला मोठी हानी पोहचवतो. मानवांच्या अनेक कृत्यांमुळे मोठ्याप्रमाणात निसर्गाची हानी होत आहे. व त्यामुळे प्रत्येक सजीवाचे जीवन धोक्यात येत आहे. म्हणूनच निसर्गाचे तसेच पर्यावरणाचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे.त्यामुळे आम्ही आज जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी ५ असे संकल्प घेऊन आलो आहोत जे पाळल्याने पृथ्वी , निसर्ग आणि पर्यावरण सुरक्षित राहण्यास नक्की मदत होईल.

पर्यावरण दिनाचा पहिला संकल्प
आपल्या घरातून दररोज भरपूर प्रमाणात कचरा निघतो. अनेक लोक हा कचरा कुठेही फेकतात. व त्यामुळे पर्यावरणाला मोठी हानी होते. तसेच हा कचरा निसर्गातील इतर पशु-पक्ष्यांच्या आहारात जाऊन त्यांचे ही जीवन धोक्यात येते. म्हणूनच जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घरातून निर्माण होणारा कचरा योग्य ठिकाणी पोहचवण्याचा पहिला संकल्प करावा.

पर्यावरण दिनाचा दुसरा संकल्प
माणसाचे जीवन श्वासोच्छवास केल्याने चालते आणि श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा अतिशय गरजेची आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनी श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्न करू, त्यासाठी पेट्रोल-डिझेलऐवजी ई-वाहन वापरू. तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर मोठ्या प्रमाणात करू.

पर्यावरण दिनाचा तिसरा संकल्प
निसर्ग हा झाडे आणि वनस्पतींवर अवलंबून आहे. परंतु सध्याच्या काळात झाडे तोड ही मोठ्या प्रमाणात होते.झाडांची संख्या कमी झाल्याने ऑक्सिजनचे ही प्रमाण कमी होते तसेच याचा परिणाम पर्यावरणावर होतो. व त्यामुळे अनेक मोठमोठ्या नैसर्गिक आपत्ती उद्भवतात. म्हणूनच आपण या जागतिक पर्यावरणदीनानिमित्त अधिकाधिक रोपे लावून निसर्गाची आतापर्यंत झालेली हानी भरून काढण्याचा प्रयत्न करू.

पर्यावरण संरक्षणाचा चौथा संकल्प
निसर्गातील एकूण एक घटक निसर्गाला सुरक्षित ठेवतात. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करत पर्यावरणाचा समतोल सदैव राखला जावा, अशी प्रार्थना करूयात तसेच पर्यावरणाचा समतोल व सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही करावे लागेल, ते सर्वकाही आम्ही करू असा संकल्प करूयात.

पर्यावरण संरक्षणाचा पाचवा संकल्प
पर्यावरण दिनी, पाचवा आणि शेवटचा संकल्प असा करावा की आम्ही पॉलिथिन किंवा प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रयत्न करू. पॉलिथिन आणि प्लास्टिक हे निसर्गला सर्वात जास्त हानी पोहचवतात. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतः त्यांचा वापर करणार नाही, त्याचप्रमाणे तुम्ही इतर कोणी पॉलिथिन किंवा प्लास्टिक वापरताना दिसले तर त्यांनाही पर्यावरणाबाबत जागरूक कराल. अशी प्रतिज्ञा घ्या.

हे ही वाचा:

घरच्या घरी बनवा Hotel Style Chiken Momos, स्पेशल रेसिपी फक्त तुमच्यासाठी…

कोण होत्या Sulochana Latkar ?, सुलोचना दीदींचा जीवनप्रवास…

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचं निधन, ९४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss