Saturday, May 18, 2024

Latest Posts

Valentine’s day निमित्ताने रोहन प्रीत ने नेहा कक्कड ला दिले सुंदर गाणे भेट

नेहा कक्कड (Neha Kakkar) आणि रोहन प्रीत (Rohan Preet) यांची लव्ह स्टोरी सर्वांना माहित आहे. हे कपल (couple) नेहमी त्यांच्या पर्सनल लाईफ मधील गोष्टी त्यांच्या चाहत्यांसोबत शेयर करत असतात. त्यांची जोडी चाहत्यांना खूप आवडते.

नेहा तिच्या नव नवीन येणाऱ्या गाण्यांबाबत चाहत्यांना माहिती देत असते. सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून ती चाहत्यांचे मनोरंजन करत असते. यंदा ही नेहा कक्क्कड एका गुड न्युज सोबत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ती गुड न्यूज काय याची चाहत्यांना खूप दिवसांपासून उत्सुकता होती,पण आता त्यांच्या प्रतिक्षेचा अंत झालेला आहे.

तुम्हा सर्वानाच माहित असेल आज व्हॅलेंटाईन डे आहे. या निमित्ताने प्रेमी प्रेमिका , तसेच सेलेब्रिटी कपल निरनिराळ्या पद्धतीने व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) साजरा करत असतात. प्रेमाच्या या खास दिवशी नेहा कक्कड आणि रोहन प्रीत यांनी प्रेमावरील त्यांचे नवीन गाणे गम खुशीया प्रदर्शित करून चाहत्यांना व्हॅलेंटाईन डे चे सुरप्राईज दिले आहे. टी सिरीजने (T-Series) व्हॅलेंटाईन डे निमित्ताने नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचे हे गाणे ‘गम खुशीयां’ (gham khushiyan) सादर केले आहे. नेहा कक्कड आणि अर्जित सिंग (Arjit Singh) ने हे गाणे गायले आहे. तसेच रोहन प्रीत ने या गाण्याचे संगीत केले आहे. या गाण्याचे बोल राणा सोतल(Rana Sotal) यांनी लिहिलेले असून भूषण कुमार (Bhushan Kumar) यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे.

या गाण्याबद्दल बोलताना नेहा कक्कर म्हणाली , “खरं म्हणजे रोहनप्रीत इतके दिवस गम खुशीयावर काम करत होता , फक्त ते मला व्हॅलेंटाईन डे गिफ्ट म्हणून देण्यासाठी, आणि ते आमच्यासाठी खूप खास आहे.” हे गाणे खूप सुंदर आहे, अरिजीतच्या आवाजाने या गाण्यात खरोखरच भर पडली आहे. मला खात्री आहे की हे गाणे प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.” असे म्हणून तिने रोहन प्रीत बद्दल प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या तर अर्जित सिंगचे कौतूक केले. नेहा कक्कड आणि रोहन प्रीत नुसते पडद्यावर नाही तर अस्सल आयुष्यातही तितकेच रोमँटिक कपल (Romantic couple) आहे. प्रेक्षक त्यांच्या या गाण्याला भरभरून प्रतिसाद देतायत.

हे ही वाचा : 

Turkey Earthquake, शेकडो इमारती जमीनदोस्त, १२०० हुन अधिक लोकांचा मृत्यू Earthquake In Turkey, ७. ९ रिश्टर स्केलच्या भूकंपानं तुर्की हादरलं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss