Sunday, May 19, 2024

Latest Posts

Exlusive मी माझ्या देशासाठी चांगलं काय करू शकतो तर जनतेच्या मनापर्यंत पोहोचण्याचा हा अद्भुत प्रयत्न – मनोज जोशी

Manoj Joshi : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी जनतेशी 'मन की बात' मधून संवाद साधतात. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. याच 'मन की बात'चा आज १०० वा कार्यक्रम प्रसारित झाला. यानिमित्त मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित विलेपार्ले येथे ‘मन की बात’ कार्यक्रमाचे स्क्रिनिंग करण्यात आले होते

Manoj Joshi : पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी जनतेशी ‘मन की बात’ मधून संवाद साधतात. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली होती. याच ‘मन की बात’चा आज १०० वा कार्यक्रम प्रसारित झाला. यानिमित्त मुंबईत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थित विलेपार्ले येथे ‘मन की बात’ कार्यक्रमाचे स्क्रिनिंग करण्यात आले होते. या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मान्यवर या कार्यक्रमला आवर्जून उपस्थित राहिले होते. अशातच सिनेसृष्टीतील लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्यासोबत टाईम महाराष्ट्रने बातचीत केली आहे.

आजच्या मन की बात’ च्या १०० व्य पर्वाबद्दल मनोज जोशी यांना विचारले असता आजचा अनुभव हा दिव्य असा होता. देशाचे गृहमंत्री आदरणीय अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समावेत मला हा एपिसोड ऐकण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. मन की बात चे सगळे एपिसोड मी पहिल्यापासून पाहत आलोय, एकात वेळी पाहण्याचं राहून गेलं तर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी वेळ मिळेल तसा मी ऐकतो कारण त्यातून प्रेरणा मिळते. असं अभिनेते मनोज जोशी यांनी सांगितले आहे. मन की बात ही गोष्ट किती अद्भुत आहे. संपूर्ण जगामध्ये असं उदाहरण एकमेव असेल अख्या जगामध्ये प्रधानमंत्री देशाच्या सकारात्मक गोष्टीसाठी एवढी कामं करतो. कामामध्ये स्वतःला झोकून देणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचे उदाहरण त्याच्या कामासकट त्याच्या आवाजासकट ते काय काम करत आहेत हे भारताचे जनते समोर त्याच्या मनापर्यंत त्यांच्या मनामनापर्यंत ते पोहोचेल असा हा अद्भुत प्रयत्न असल्याच अभिनेते मनोज जोशी यांनी टाईम महाराष्ट्र सोबत बोलताना सांगितला आहे.

याच्यातून एक सद्भाव सकारात्मकता एकता आणि मी माझ्या देशासाठी काय करू शकतो ही भावना मन की बात मधून कळते. आपल्या देशातील संस्कृती आहे की सगळ्यांचे कल्याण आपण मागतो. शेवटी आपण मानव आहोत मला असं वाटतंय यातून समाज कल्याण व्हावा समाज उदर व्हाव समाज पुढे जावा, समाज पुढे गेला तर व्यक्ती पुढे जर व्यक्ती पुढे गेली तर देश पुढे जाईल आणि देश पुढे गेला तर आपण सगळेच पुढे जाऊ असा विश्वास जेष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनी व्यक्त केला आहे.

हे ही वाचा : 

EXLUSIVE एखाद्या छोट्या गोष्टीची सुरुवात पंतप्रधानांनी सुरू केल्यावर ती किती मोठी होऊ शकते ‘मन की बात’ मधून छान उदाहरण – सचिन खेडेकर

उन्हाळ्यामध्ये कोंडा होण्याचा संभव; करा हे उपाय घरच्या घरी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

 

Latest Posts

Don't Miss