Monday, May 20, 2024

Latest Posts

डॉक्टर ऐवजी अभिनेत्री झाली… कोण आहे ती अभिनेत्री?

अभिनेत्री साई पल्लवीचा लवकरच प्रदर्शित होणारा चित्रपट ‘रामायण’ यामध्ये ती सीतेची भूमिका करणार आहे. काही दिवसांपूर्वी रणबीर आणि साई पल्लवीचे फोटो सोशल मिडीयावर वायरल झाले होते. तेव्हापासून चाहते चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. ९ मे रोजी साई पल्लवीचा ३२ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. साईचा जन्म तामिळनाडू येतील कोटागिरी येथे झाला. साई पल्लवीला चित्रपटसृष्टीमध्ये यायचा विचार नव्हता. तिला हृदयरोगतज्ञ व्हायचं होतं. २०१४ मध्ये शिकत असताना ‘प्रेमम’ चित्रपटात काम करण्याची संधी तिला मिळाली. या चित्रपटासाठी तिला साउथचा फिल्मफेयर  पुरस्कार पण मिळाला होता. त्यानंतर तिला अनेक चित्रपटात काम करायची संधी मिळत गेली आणि नंतर तिने मागे वळूनही पाहिले नाही.

एका मुलाखतीदरम्यान तिने एक किस्सा सांगितला होता. त्यात ती म्हणाली, मी सातवीत असताना एका मुलाला प्रेम पत्र लिहलं  होतं आणि ते घरच्यांना सापडले. यानंतर मला घरच्यांनी खूप मारले. असे तिने ‘विराट पर्वाम’ या चित्रपटाच्या मुलाखतीदरम्यान सांगितले. एका फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीसाठी २ कोटी रुपयांची ऑफर तिला आली होती. पण तिने ती नाकारली कारण, अश्या मिळणाऱ्या पैशाचं मी काय करणार? मी घरी जाऊन तीन चपाती किंवा भात खाईन पण चुकीच्या गोष्टी करणार नाही. चुकीच्या गोष्टीवर आपल्या भारतात लवकर विश्वास ठेवतात. असे साई म्हणाली होती. अभिनय आणि कौतुकास्पद निर्णय घेणारी अभिनेत्री साई पल्लवी एका वादात सापडली होती. वास्तविक धर्माच्या नावाखाली होत असलेल्या हिंसाचारावर तिने टीका केली होती. त्यामुळे ट्रॉलर्सच्या नजरेत साई राहिली होती.

 

हे ही वाचा:

Mother’s Day का साजरा करतात तुम्हाला माहिती आहे का?

लग्नाच्या पाच वर्षानंतर रणवीरने केले फोटो डिलीट ?; चाहता वर्ग नाराज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss