Sunday, May 19, 2024

Latest Posts

लग्नाच्या पाच वर्षानंतर रणवीरने केले फोटो डिलीट ?; चाहता वर्ग नाराज

रणवीर आणि दीपीकाच्या स्वभावामुळे त्यांचा चाहता खुप मोठा आहे. मात्र अचानक असे काय झाले की ज्याने रणवीरने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन आपल्या लग्नाचे फोटोज डिलीट केले आहे. 

बॉलीवूड कपल (Bollywood Couple) अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukon) सध्या सर्वत्र चर्चेत आहेत. दीपिका आणि रणवीर लवकरच आई बाबा होणार असल्याची गोड बातमी त्यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून दिली. पण काही दिवसांपूर्वी रणवीरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्या दोघांचे एकत्र असलेले फोटो डिलिट केले आहेत. त्यामुळे दोघांच्या नात्यामध्ये काही तरी बिनसलं आहे का? अशा चर्चा सगळीकडे सुरु आहे.

रणवीर आणि दीपिका त्यांच्यामध्ये दुरावा आल्याची बातमी नेहमीच चर्चेत असायची. त्यामुळे आता रणवीरने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरून त्यांच्या लग्नाचे फोटो डिलिट केल्यामुळे चाहता वर्ग नाराज झाला आहे.रणवीर आणि दीपीकाच्या स्वभावामुळे त्यांचा चाहता खुप मोठा आहे. मात्र अचानक असे काय झाले की ज्याने रणवीरने त्याच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन आपल्या लग्नाचे फोटोज डिलीट केले आहे.

रणवीर आणि दीपिका ”राम लीला” या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते. त्यानंतर त्या दोघांची मैत्री झाली नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यादोघांनी अनेक चित्रपटात काम केले आहे.अनेक वर्षांच्या डेटिंग नंतर दोंघानी १४ नोव्हेंबर २०१८ रोजी इटलीमध्ये जाऊन लग्नगाठ बांधली. इटलीमध्ये लग्न केल्यांनतर त्यांच्या लग्नाची चर्चा चांगलीच गाजली होती

सध्या हे दोघेही वेकेशन मोडवर आहे.लग्नाच्या ५ वर्षानंतर दीपवीर यांनी चाहत्या वर्गाला गूड न्यूज दिली.त्यामुळे चाहता वर्ग आनंदी झाला होता पण रणवीरने फोटो डिलीट केल्याने पुन्हा एकदा नाराज झाल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा:

met gala 2024 : आलिया भट्टचा नवा लुक घालतोय सोशल मीडियावर धुमाकूळ

साबुदाण्याची खिचडी तर सर्वानाच माहिती आहे , पण कधी साबुदाण्याचे पराठे ट्राय केलेत का?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss