आदित्य नारायण होणार का बिग बॉस ओटीटी सिझन २ मध्ये सहभागी

टेलिव्हिजनवरचा प्रसिद्ध शो बिग बॉसचा आता ओटीटी सिझन २ ची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. बिग बॉस ओटीटीच्या सीझन २ (Bigg Boss Season 2) मध्ये कोणते स्पर्धक असणार या सीझनमध्ये काय नवीन पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत

आदित्य नारायण होणार का बिग बॉस ओटीटी सिझन २ मध्ये सहभागी

टेलिव्हिजनवरचा प्रसिद्ध शो बिग बॉसचा आता ओटीटी सिझन २ ची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. बिग बॉस ओटीटीच्या सीझन २ (Bigg Boss Season 2) मध्ये कोणते स्पर्धक असणार या सीझनमध्ये काय नवीन पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. या कार्यक्रमाच्या मागील सीझनमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले विविध सेलिब्रेटी सहभागी झाले होते. मागील बिग बॉस ओटीटी सिझन १ मध्ये दिव्या अग्रवाल ही विजेती झाली होती. सूत्रानुसार असे सांगण्यात येत आहे की नवीन येणाऱ्या बिग बॉस ओटीटी सिझन २ मध्ये प्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा गायक आदित्य नारायण (Aditya Narayan) सुद्धा सहभागी होणार आहे अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.

आदित्य नारायणने त्याच्या सोशल मीडियावर पोस्ट करून त्याने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्याने या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना माहिती दिली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरी (Instagram story) मध्ये लिहिले आहे की ‘खतरों के खिलाडी’ माझा पहिला आणि शेवटचा रिऍलिटी शो होता जिथे चाहत्यांनी मला स्पर्धक म्हणून पाहिलं. हा आयुष्यात एकदा घेतलेला अनुभव आहे आणि तो नेहमीच लक्षात राहील.’ आदित्य नारायणाच्या या पोस्टवरून लक्षात येत आहे की तो बिग बॉस ओटीटी २ मध्ये सहभागी होणार नाही. असे सांगितले जात आहे की ‘लॉक अप’चा (Lockupp) विजेता मुनावर फारुकी (Munawar Farooqui) देखील बिग बॉस ओटीटी सिझन २ मध्ये सहभागी होणार आहे.

हे ही वाचा:

Manipur मध्ये माजी आमदाराने भडकवली दंगल, तब्बल ५ दिवसांसाठी इंटरनेट सेवा बंद

जयंत पाटलांना #ED चौकशीत घेऊन कोणाचा कार्यक्रम कोण करतंय? Who is targeting |

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version