Tuesday, June 6, 2023

Latest Posts

ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न – संजय शिरसाट

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीने चौकशीसाठी २ वेळे समज दिले होते मात्र जयंत पाटील यांनी वेळ मागवून घेतली होती.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीने चौकशीसाठी २ वेळे समज दिले होते मात्र जयंत पाटील यांनी वेळ मागवून घेतली होती. आजच्या दिवशी सकाळी ११ च्या सुमारास जयंत पाटील हे ईडी कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यानी रस्त्यावर आंदोलने केले . आणि विरोधकांवर ताशेरे उडवले. जयंत पाटील मुंबईच्या ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. तर अडीच ते तीन तासाभरापासून जयंत पाटील यांची तीन अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरुन राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत.

शिवसेनेचे (शिंदे गट) प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ईडीकडून नोटीस मिळाल्यावर शक्तिप्रदर्शन करण्याचा नवीनच पॅटर्न पाहायला मिळत असल्याचं शिरसाट यांनी म्हटले आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील आपल्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदत शिरसाट बोलत होते. दरम्यान यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, “एखाद्याला ईडीची नोटीस आली तर त्याने शक्तिप्रदर्शन करणे, त्यानुसार आपल्या यंत्रणेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणं चुकीचे आहे. ईडीची नोटीस आली म्हणजे ताबडतोब शिक्षा होते अशातील भाग नाही. त्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली तर कारवाई करायची की नाही हे ईडी कार्यालय ठरवेल. पण ईडी, सीबीआय यांचा वापर राजकीय लोक करत असल्याचा काही लोकांचा गैरसमज झाला आहे. विशेष म्हणजे जर ईडीचं असा राजकीय वापर करायचाच असता तर अनेकजण आतमध्येच दिसले असते. बाहेर आलेच नसते,” असेही शिरसाट म्हणाले.

शिरसाट यांनी भाजप कितीही राष्ट्रीय पक्ष असला तरीही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच त्यांच्या कार्यालयात किंवा घरी जाऊन युतीची बोलणी केली नाही. आणि कधीही आयुष्यात असे झालं नाही. असेहोई संजय शिरसाट म्हणाले. मात्र हे कटोरा घेऊन दुसऱ्याच्या दारावर जात आहेत आणि बाळासाहेब याचं नाव घेतात. त्यामुळे यांना जोड्याने मारले पाहिजे. बाळासाहेबांनी तुम्हाला हे शिकवले का?, स्वाभिमान हे सर्वात आधी बाळासाहेबांच बोलणं होते. माझा शिवसैनिक स्वाभिमानी असला पाहिजे असे म्हणायचे. उपाशी पोटी असला तरीही शिवसैनिक जय भवानी जय शिवाजी म्हणायचा. मात्र आता हे लोकं जय शरद पवार आणि जय राहुल गांधी करत आहेत. अशा नालायक लोकांमुळेच उद्धव ठाकरे गटाचे असे हाल असल्याचे संजय शिरसाट म्हणाले.

हे ही वाचा:

चप्पल चोराने तब्बल ५५ चप्पल आणि बूट जोड चोरले कुठे घडली ही घटना…

समीर वानखेडेंच्या सीबीआय चौकशीचा भाजपाला एवढा त्रास का?, नाना पटोले

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss