Tuesday, May 21, 2024

Latest Posts

“शिवरायांच्या गादी पुढे मोदी कोणीच नाही”;SANJAY RAUT यांचा PM NARENDRA MODI यांच्यावर निशाणा

मोदी आणि त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात करेक्ट कार्यक्रम करायचा हे कोल्हापूरकरांनी ठरवलं आहे.अशा शब्दात मोदींवर टीका केली. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला दिवसेंदिवस वेग आला आहे. या प्रचाराच्या माध्यमातून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे वारे सुरु आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी Pm Narendra Modi  हे शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी कोल्हापूरात येत आहेत. यावर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत Sanjay Raut यांनी “शिवरायांच्या गादी पुढे मोदी कोणीच नाही” असे म्हणत मोदींवर जोरदार टीका केली आहे.

महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज यांच्या विरोधात शिवसेनेचे  खासदार संजय मंडलिक Sanjay mandlik  आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने Dhairshil Mane अशी लढत असल्याने संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ मोदी कोल्हापूरात जाहीर सभा घेणार आहेत. यावर “छत्रपती शाहू महाराज यांचा पराभव करण्यासाठी मोदी आज कोल्हापूरात येत आहेत. त्यामुळे त्यांना जनता माफ करणार नाही.”असे संजय राऊत म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “शाहू महाराजांच्या विरोधातील प्रचार जनता विसरणार नाही. कोल्हापूरात मोदी येत आहे हे ऐकून मला आश्चर्य बसला.कोल्हापूरात मोदींची गादी नाही आहे”.”मान ही गादीला आणि मत ही गादीला” ही कोल्हापूरकरांची घोषणा आहे. मोदी आणि त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात करेक्ट कार्यक्रम करायचा हे कोल्हापूरकरांनी ठरवलं आहे.अशा शब्दात मोदींवर टीका केली.

दरम्यान,”छत्रपती शाहू महाराज यांचं या देशात मोठं योगदान आहे. ज्या छत्रपती शाहू महाराजांनी देशाला पुरोगामी विचार दिला. शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. खरं तर भारतीय जनता पक्षाने कोल्हापूरमध्ये उमेदवार उभा करणं हेच चूक आहे,आमची इच्छा होती की, शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्यावं आणि महाराष्ट्राच्या परंपरेचा सन्मान करावा” असे संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

Naresh Mhaske Exclusive: बहिणीच्या जागी उभे राहिलात आणि त्यांना दुसरीकडे पाठवता, Pankaja Munde यांना टोला

BJP ने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या Eknath Shinde यांनी Congress वर बोलू नये, Nana Patole यांचा घणाघात

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss