Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? Eknath Shinde की Raj Thackeray?

सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिकांची सुपरहिट मेजवानी ही सुरूच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना देखील नवं नवीन कार्यक्रम हे पाहायला मिळत आहेत अश्यातच आता आणखी एका नव्या कार्यक्रमाची भर ही पडली आहे.

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? Eknath Shinde की Raj Thackeray?

सध्या छोट्या पडद्यावर अनेक मालिकांची सुपरहिट मेजवानी ही सुरूच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना देखील नवं नवीन कार्यक्रम हे पाहायला मिळत आहेत अश्यातच आता आणखी एका नव्या कार्यक्रमाची भर ही पडली आहे. ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) हा नवा कार्यक्रम लवकरच आपल्या सर्वच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमात आता पहिला नंबर नेमकं कोण लावणार याची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात रंगात आहे.

अवधूत गुप्तेच्या (Avadhoot Gupte) ‘खुपते तिथे गुप्ते’ (Khupte Tithe Gupte) या कार्यक्रमाचं नवं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘खुप्ते तिथे गुप्ते’च्या पहिल्याच भागात प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. सुरुवार दमदार होणार आहे. त्यामुळे आगामी भागांमध्ये कोण कोण हजेरी लावणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. झी मराठी या वाहिनीने नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलताना दिसत आहेत की,”खुपते तिथे गुप्ते इथे प्रश्नांना धार आहे, पण मी पण तयार आहे”. झी मराठीने “प्रश्नांना कितीही असो धार माननीय मुख्यमंत्री आहेत तयार”, असं म्हणत हा प्रोमो शेअर केला आहे. तसेच गुप्तेंच्या खोचक आणि धारदार प्रश्नांना राज ठाकरेदेखील तेवढीच धारदार उत्तरे देताना दिसणार आहेत.

हे ही वाचा : 

मविआ ची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार, जयंत पाटील

Sharad Pawar यांनी बोलावली मविआ ची महत्वाची बैठक, जागा वाटपावर चर्चा होणार?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Exit mobile version