ख्रिसमस हा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे.खरतर हा सण लहान मुलांचा अगदी आवडता सण आहे.कारण ख्रिसमसला या छान छान गिफ्टजे मिळतात.आनंदाचा हा सण, ख्रिसमस, दरवर्षी 25 डिसेंबरला जगभरात साजरा केला जातो. या खास दिवशी मुलांना चॉकलेट, केक आणि भेटवस्तू दिल्या जातात. ख्रिसमसच्या एका संध्याकाळी, लोक सिक्रेट सांताचा गेटअप करून लहान मुलांना भेटवस्तू देतात.
मुलेही सिक्रेट सांताची आतुरतेने वाट पाहत असतात. जेणेकरून त्यांनाही सांताकडून भेटवस्तू मिळतील. एवढेच नाही तर या दिवशी लहान मुले सांताचा ड्रेस परिधान करून खूपच गोंडस दिसतात. तुम्हीही या वर्षी तुमच्या मुलाला सांताक्लॉज बनवण्याचा विचार करत असाल तर जाणुन घ्या या गोष्टीं…
कपडे
जर तुम्हीही या ख्रिसमसला तुमच्या मुलाला सांता बनवण्याचा विचार करत असाल, तर सर्वात आधी बाजारातून लहान मुलाच्या आकाराचे सांताक्लॉजचे कपडे खरेदी करा. अनेक वेळा, पैसे वाचवण्यासाठी, पालक त्यांच्या मुलासाठी आकाराने मोठा ड्रेस खरेदी करतात. जेणेकरून तो पुढच्या वर्षीही तो घालू शकेल. हे अजिबात करू नका. मुलांना परफेक्ट फिट होईल असाच ड्रेस विकत घ्या.
थंडीपासून सावध रहा
ख्रिसमस जसजसा जवळ येतो तसतशी थंडी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे मूलं आजारीही पडू शकतात. मुलाला सांताक्लॉजचे कपडे घालण्यापूर्वी, त्याला आत उबदार कपडे घाला. थंडीचे दिवस आहेत, त्यात सकाळची शाळा असते. त्यामुळे सांताक्लॉजच्या ड्रेसने मुलाचे आतील आणि आतील कपडे व्यवस्थित झाकलेले आहेत हे लक्षात ठेवा.
कॅप, पिशवी विसरू नका
मुलाला सांताचा लुक देण्यासाठी पोम पॉम असलेली सांता कॅप घाला. तसेच खांद्यावर लहान लाल रंगाची पिशवी घ्यायला सांगा. ज्यामध्ये इतर मुलांसाठी भेटवस्तू, चॉकलेट असतील. यामुळे मुलांना इतर मित्रांसोबत वस्तू वाटण्याची सवय लागेल.
बेल्ट देखील महत्वाचा आहे
जर तुम्हाला तुमचे मुल हुबेहुब सांता सारखे दिसायचे असेल तर, एक मोठा काळा बेल्ट आणि काळे चमकदार बूट घालायला विसरू नका. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यासोबत पांढऱ्या रंगाचे हातमोजेही घालू शकता. जे सांताच्या लुकला परफेक्ट मॅच होतील.
दाढीचा वापर
आजकाल बाजारात पांढर्या रंगाची सांता दाढी वेगळी उपलब्ध आहेत. जी तुम्ही मुलांच्या चेहऱ्यावर लावू शकता. यासाठी तुम्हाला ते चिकटवण्याची गरज नाही कारण त्यात रबर आहे. पांढऱ्या दाढीसोबतच मुलाला पांढरे केस आणि एक चष्मा द्यावा. ज्यामुळे शाळेतील फॅन्सी ड्रेसमध्ये त्यांचाच नंबर येईल.
मुलांना हे शिकवा
मुलांना सांता सारखे चालणे अन् काही संवाद म्हणायला शिकवा. ज्यामुळे तुमचा मुलगा केवळ सांता सारखा दिसणारच नाहीतर त्याच्यासारखेच बोलेल. सांता सगळ्यांना गिफ्ट देतो तसेच मुलाला समाजातील गरीब मुलांसाठी सांता व्हायला शिकवा.
हे ही वाचा:
‘ झिम्मा २’ फेम शिवानी सुर्वे लवकरच अडकणार लग्नबंधनात ? शेअर केलेला व्हिडिओ होतोय व्हायरल
Assembly Winter Session 2023 : विधानसभेत देवेंद्र फडणवीसांची जोरदार फटकेबाजी, म्हणाले…
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.