Sunday, May 5, 2024

Latest Posts

दत्त जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी हे आहेत खास संदेश

मार्गशीष महिन्याच्या शुक्ल पक्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरा केली जाते.

मार्गशीष महिन्याच्या शुक्ल पक्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरा केली जाते. यंदाच्या वर्षी दत्त जयंती २६ डिसेंबरला साजरी केली जाणार आहे. भगवान दत्त हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचे अवतार म्हणून ओळखले जातात. ऋषी अत्री आणि अनुसया यांच्या पोटी श्री दत्तात्रेय भगवान यांनी जन्म घेतला. मार्गशीष पौर्णिमेला प्रदोष काळात श्री दत्तात्रेय भगवान यांची पूजा केली जाते. यंदाच्या वर्षी मार्गशीष पौर्णिमा २६ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजून ४६ मिनिटांनी सुरु होणार आहे तर दुसऱ्या दिवशी २७ डिसेंबरला ६ वाजून २ मिनिटांनी संपणार आहे. या दत्त जयंतीला तुम्हला तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्र परिवाराला शुभेच्छा द्याच्या असतील तर तुम्ही हे संदेश पाठवू शकता.

धावत येसी भक्तांसाठी,
ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा!!
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!!
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

चरण शुभंकर फिरता तुमचे,
मंदिर बनले उभ्या घराचे,
घुमटा मधुनी हृदयपाखरु स्वानंदे फिरले,
मला ते दत्तगुरु दिसले,
श्री दत्त जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा!

॥अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त॥
सुख, सामर्थ्य, ऐश्वर्य, समृद्धी,शांती
तुमच्या जीवनी वसो, दत्ता चरणी ही प्रार्थना
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

दत्तकथा वसे कानी
दत्तमूर्ती ध्यानीमनी
दत्तालागी अलिंगना
कर समर्थ हे जाणा
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

हे ही वाचा:

POLITICS: प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी सोबत यावं- VIJAY WADETTIWAR

शुभमंगल सावधान; प्रेमाची गोष्ट मालिकेत सागर-मुक्ताचा विवाहसोहळा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss