Saturday, March 2, 2024

Latest Posts

POLITICS: प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडी सोबत यावं- VIJAY WADETTIWAR

सुधीर पारवे आमदार असताना स्थगिती मिळेपर्यंत त्यांची आमदारकी २४ तासात रद्द केली नाही. बच्चू कडू यांच्या बाबतीतही तेच झालं.

लोकसभा निवडणुकीचा सर्व्हे काय आला पाहिलं नाही, थोडी बेईमानी नाही झाली तर निकाल आमच्या बाजूने लागेल अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (VIJAY WADETTIWAR) यांनी  दिली. सर्व्हे काय आला हे मी पाहिलेलं नाही. मध्यप्रदेशचा (MADHYAPRADESH) सर्वे आमच्याच बाजूला आलेला होता. थोडी बेईमानी झाली नाही तर निकाल आमच्या बाजूने लागेल, असे मत त्यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केले. दुसऱ्यांचे पक्ष फोडून, दुसऱ्यांचे घर जाळून स्वतःचं घर तुम्ही सजवतात हे लोकांना कधीही आवडणार नाही. त्याचा परिणाम महायुतीला भाजपला भोगावा लागेल. दुसऱ्यांचे पक्ष फोडून, चिन्ह घेऊन, जी बेइमानी झाली पक्ष संपवण्याचा कामं झालं. लोकांची घर फोडायची आणि स्वतःचं घर सजवायचं. लोकं हेच स्वीकारणार नाही. निवडणुकीच्या माध्यमातून या सगळ्याचे उत्तर जनता देईल, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडी व्हावी

प्रकाश आंबेडकर (PRAKASH AMBEDKAR) यांच्या मुद्द्याला घेऊन विजय वडेट्टीवार म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांनी काय म्हटलं यावर उत्तर देणार नाही. प्रकाश आंबेडकर यांची सभा होत आहे आणि ही सभा चांगली व्हावी अशी आमची इच्छा आहे. वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची (CONGRESS) आघाडी व्हावी, अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आघाडी झाल्यास महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी  मिळणार आहे. आमची सगळ्यांची इच्छा आहे. प्रकाश आंबेडकर (PRAKASH AMBEDKAR) यांनी महाविकास आघाडी सोबत यावं.

लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू

सुनील केदार (SUNIL KEDAR) यांची आमदारकी रद्द केल्याप्रकरणी विजय वडेट्टीवार यांनी त्यांचे मत मांडले. विरोधकांना संपवण्याचा विडाच सरकारने उचललेला आहे. त्यांना दोषी ठरवणे. त्यांना संपवून अशा पद्धतीचे कायदे करून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे. सुधीर पारवे आमदार असताना स्थगिती मिळेपर्यंत त्यांची आमदारकी २४ तासात रद्द केली नाही. बच्चू कडू यांच्या बाबतीतही तेच झालं. सुनील केदार यांच्या संदर्भात २४ तासात कारवाई होते.जिल्हा परिषदेत भाजपचा दारुण पराभव झाला. ग्रामीण भागात सुनील केदार यांनी भाजपला टिकू दिले नाही. त्यामुळे त्यांना संपवण्याचा काम करत हा बदला घेण्याचा प्रयत्न झाला.

हे ही वाचा:

Christmas Wish 2023, ख्रिसमस निम्मित तुमच्या प्रियजनांना व्हाट्सअँपद्वारे द्या खास शुभेच्छा

Christmas 2023: ख्रिसमसच्या निमित्ताने लहान मुलांना द्या ‘या’ भेटवस्तू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss