Sunday, May 5, 2024

Latest Posts

आज आहे Blue Christmas Day, पण म्हणजे काय तुम्हाला माहित आहे का ?

दरवर्षी हिवाळ्याची सर्वात मोठी रात्र दिनांक २१ डिसेंबर रोजी येते. ज्याला हिवाळी संक्रांती म्हणतात. हा दिवस पाश्चिमात्य देशांमध्ये 'ब्लू ख्रिसमस' म्हणून साजरा केला जातो.

Blue Christmas Day 2023 : सर्वत्र ख्रिसमसची जोरदार तयारी ही सुरु झाली आहे. अवघ्या काही दिवसांवर ख्रिसमस हा सण येऊन ठेपला आहे. ख्रिसमस म्हंटल कि लहानग्यांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचीच तयारी ही सुरु असते. तसेच काही ठिकाणी ख्रिसमस पार्टीचे देखील आयोजन हे केले जाते. तर ख्रिसमस च्या आधी अनेक ठिकाणी ‘ब्लू ख्रिसमस’ देखील साजरा केला जातो. परंतु हा ‘ब्लू ख्रिसमस’ नक्की आहे तरी काय ?

सर्वत्र ख्रिसमसमध्ये आनंद आणि उत्साहाचे वातावरण हे असते. संपूर्ण जगात आपल्यलाला रोषणाई ही दिसून येते. परंतु या मध्ये देखील काही लोक हि आनंदापासून लांब असतात. त्यांना एकाकीपणा, काळजी किंवा दुःखाचा सामना करावा लागतो. अशा लोकांसाठी ‘ब्लू ख्रिसमस’ साजरा केला जातो. दरवर्षी हिवाळ्याची सर्वात मोठी रात्र दिनांक २१ डिसेंबर रोजी येते. ज्याला आपण हिवाळी संक्रांती असे देखील म्हणतो. हा दिवस पाश्चिमात्य देशांमध्ये ‘ब्लू ख्रिसमस’ म्हणून साजरा केला जातो. ब्लू ख्रिसमस म्हणजे – दुःखी ख्रिसमस. या दिवशी नागरिक एकमेकांना आधार देत असतात. एकमेकांच्या दु:खात सहभागी होतात आणि एकमेकांना समस्यांशी लढण्याचे धैर्य देखील देत असतात. हा दिवस म्हणजे दुःख आणि एकाकीपणाशी लढण्याची संधी असते. त्या लोकांना दिलासा आणि आधार देणे हा त्याचा उद्देश आहे. जे काही कारणाने दुःखी आहेत. एकमेकांना आधार देणे, आधार देणे ही या दिवसाची भावना आहे. या दिवशी, लोक एकमेकांना आधार देऊन आणि त्यांचे दुःख सामायिक करून दुःख आणि तणावाशी लढण्यासाठी धैर्य गोळा करतात.

ख्रिसमस हा सहसा प्रत्येकासाठी आनंदाचा काळ असतो. परंतु असे काही लोक आहेत ज्यांना या विशेष प्रसंगी काम करण्यास भाग पाडले जाते जेणेकरून आपल्या सर्वांची सुरक्षा सुनिश्चित केली जाईल. जसे – पोलिस, डॉक्टर, सुरक्षा रक्षक इ. ब्लू ख्रिसमस हा अशा लोकांप्रती आपली सहानुभूती दाखवण्याचा आणि त्यांच्या सेवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे. या दिवशी आपण त्यांना भेटवस्तू देऊन किंवा त्यांचे आभार मानून त्यांचे मनोबल वाढवतो. अशा लोकांचा सन्मान करण्याची ही चांगली संधी आहे. ब्लू ख्रिसमस या दिवसाचा उद्देशच असा आहे की, त्रासलेल्या आणि दुःखी लोकांमध्ये आनंद पसरवणे. या दिवशी, मेणबत्त्या पेटवून, प्रार्थना करून आणि त्यांच्यासोबत वेळ घालवून दुःखी लोकांच्या दु:खात सहभागी होणे असा आहे.

हे ही वाचा:

POLITICS: मुंबईचे महत्त्व तुम्ही कमी करू नका, काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

MAHARASHTRA: कायद्यात बदल, डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास DOCTOR दोषी नाही

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss