Saturday, March 2, 2024

Latest Posts

MAHARASHTRA: कायद्यात बदल, डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास DOCTOR दोषी नाही

वैद्यकीय प्रक्रिया करताना नोंदणीकृत डॉक्टरने असे कृत्य केलं तर, त्याला दोन वर्षांपर्यंत तुरुंगावस्थेचे शिक्षा होते आणि दंडही होऊ शकतो.

सध्या देशभरात वैद्यकीय क्षेत्रामध्ये एखाद्या डॉक्टरने निष्काळजीपणा केला किंवा त्याच्यामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर डॉक्टरवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ ए नुसार गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जात होता. या सर्व बाबींकडे डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने अनेकदा सरकारचे लक्ष वेधलं होतं आणि आता याची दखल घेण्यात आली आहे. या कायद्यात बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकसभेत २० डिसेंबर रोजी भारतीय न्यायिक संहिता विधेयकात सुधारणा मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला तर डॉक्टरांना दोषी धरण्यात येणार नाही. तसेच, अशा परिस्थितीत शिक्षा दोन वर्षांपर्यंत कमी करण्याची तरतूद करण्यात आली आहे,

एखाद्या डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा कलम ३०४ ए नुसार गुन्हा दाखल केला जात होता.. यावर विचार करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशन ने ३० नोव्हेंबर रोजी सरकारला पत्र देऊन याकडे लक्ष वेधले होतं. या कायद्यात बदल करण्याच्या सूचना ही डॉक्टरांकडून करण्यात आल्या होत्या. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संस्थेत माहिती देत प्रचलित कायद्यात नवीन बदल करून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाला, तर त्याच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा ३०४ एक कलमातून वगळण्यात येणार असून त्यात नवीन बदल करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.

या कायद्यामध्ये किंवा या निर्णयांमध्ये नक्की काय काय बदल असणार आहे, याबाबत ते स्पष्टीकरण देण्यात आले नसले  तरीही देशभरात या निर्णयाचे डॉक्टरांच्या संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशन इंडियन मेडी कोर्स फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन या सर्व संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सर्व स्तरातून डॉक्टर संघटना या  निर्णयाचे स्वागत करताना दिसून येत आहे. वैद्यकीय प्रक्रिया करताना नोंदणीकृत डॉक्टरने असे कृत्य केलं तर, त्याला दोन वर्षांपर्यंत तुरुंगावस्थेचे शिक्षा होते आणि दंडही होऊ शकतो. कलम १०६ (१) निष्काळजीपणामुळे मृत्यूला कारणीभूत ठरतो. दोषी हत्या प्रकरणांमध्ये डॉक्टरांची शिक्षा कमी करण्याची तरतूद दुरुस्तीमध्ये करण्यात आली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शिष्टमंडळाने या संदर्भात त्यांना पत्र लिहिले आहे, अशी माहिती अमित शहा यांनी दिली.

हे ही वाचा:

मिमिक्री ही एक कला…, कल्याण बॅनर्जी यांचे राज्यसभेचे सभापती धनखर प्रकरणावर स्पष्टीकरण

Maharashtra: देशभरासह राज्यात भरली हुडहुडी, २५ डिसेंबरनंतर थंडी वाढण्याची शक्यता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss