Tuesday, May 21, 2024

Latest Posts

स्वादिष्ट ‘बासुंदी’ बनवण्याची सोपी पद्धत तुम्हाला माहिती आहे का?

सणासुदीला काय गोड बनवायचं हा प्रश्न पडतो. पण तुम्ही कधी घरी बासुंदी बनवली आहे का? बासुंदी ही चवीला गोड असते. बरेचजण बासुंदी पुरीसोबत खातात. बासुंदी महाराष्टात, गुजरात आणि कर्नाटकात आवडीने खाल्ली जाते. घरच्या घरी बासुंदी कशी बनवायची तुम्हाला माहिती आहे? ही बासुंदी फक्त ३० मिनिटांमध्ये घरी बनवता येते.  बासुंदीसाठी दूध, हिरवी वेलची, साखर आणि केशर इत्यादी साहित्य लागते. चला तर जाणून घेऊयात बासुंदीची कृती.

साहित्य

१. दूध
२. वेलची पूड
३. बदाम-पिस्ता
४. साखर
५. केशर
६. लिंबाचा रस

कृती

बासुंदी करताना सर्व दूध एकत्र गरम करू नये. जाड कढईमध्ये अर्ध दूध आटवत ठेवा. दूध चांगले आटवून झाल्यावर बाजूला काढून ठेवा. त्यानंतर बाजूला काढलेले दुसरे दूध आटवण्यास गॅसवर ठेवा. दूध गरम झाल्यावर दोन्ही दूध एकत्र करा. आवडीप्रमाणे त्यात साखर घालावी. नंतर केशर हलके गरम करून बारीक करून टाका. त्यानंतर त्यामध्ये बदाम, पिस्ता, वेलची पूड टाकून चांगले एकत्र करून घ्या. बासुंदी नेहमी घट्ट झाली पाहिजे. थोड्यावेळाने गॅस मोठा करून दूध चांगल्याप्रकारे आटवत राहा. बासुंदी गॅसवरून खाली उतरवल्यावर थंड होईपर्यंत ढवळत राहा. साय तयार होणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्या. तर मग तयार आहे स्वादिष्ट अशी बासुंदी.

हे ही वाचा:

आज MNS चा गुढीपाडवा मेळावा ! Raj Thackeray काय भूमिका घेणार यावर असणार लक्ष

Deepika च्या पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष, काय म्हणाली?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss