Thursday, May 16, 2024

Latest Posts

Deepika च्या पोस्टने वेधलं सर्वांचं लक्ष, काय म्हणाली?

बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) लवकरच आई होणार आहे. रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि दीपिका पादुकोण यांनी त्यांच्या सोशल मिडिया माध्यमातून ही बातमी दिली आहे. दीपिका पादुकोणने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिने असे लिहले आहे, “कमी पोस्ट करत आहे आणि काम जास्त करत आहे. तुलना कमी आणि शिकण्याचा प्रयत्न जास्त करत आहे. तक्रार कमी आणि प्रार्थना जास्त करत आहे. कमी बोलतेय आणि काम जास्तीत-जास्त करण्यावर भर आहे” या पोस्टवर दीपिकाचे चाहते कमेंट करून सर्व काही ठिक आहे ना? असं विचारत आहेत.

दीपिका सध्या प्रेग्नंसी स्टेज एन्जॉय करत आहे. सध्या तिने ब्रेक पण घेतला आहे. नुकताच प्रदर्शित झालेला तिचा  चित्रपट ‘फायटर’ (Fighter) बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. त्याआधी तिने ‘जवान’ (Jawan) आणि ‘पठाण’ (Pathaan) या दोन चित्रपटांमध्ये तिने काम केले होते. आता लवकरच तिचा अजय देवगण सोबत ‘सिंघम अगेन’ (Singham Again) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘कल्कि 2898 एडी’ या दाक्षिणात्य चित्रपटामध्ये दीपिका दिसून येणार आहे. चाहते तिच्या चित्रपटाची फार उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी पद्मावत, बाजीराव मस्तानी, गोलियों की रासलीला: रामलीला, 83, सर्कस इत्यादी चित्रपटामध्ये एकत्र काम केले आहे. अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर त्यांनी २०१८ मध्ये लग्न केले. दीपिका आणि रणवीरच्या घरी सप्टेंबर २०२४ मध्ये छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे, अशी २९ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट टाकली होती.

हे ही वाचा:

‘फणस खाण्याचे’ फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?

झटपट “रवा वडा” बनवण्याची सोपी पद्धत

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss