करवंद हे फळ उन्हाळयात मिळतात. करवंदपासून अनेक पदार्थ बनवले जातात. काहीजण वरणात करवंद टाकतात. चटणीने तोंडाला चव येते. करवंदे आंबट असतात. करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात खूप प्रमाणात मिळतात. पण कधी करवंदपासून लोणचे घरी बनवले आहे का? चला तर मग जाणून घेऊयात करवंदाच्या लोणच्याची रेसिपी.
साहित्य –
- करवंद
- साखर
- गुळ
- मोहरी
- हिंग
- हळद
- मीठ
- लाल तिखट
- कढीपत्ता
कृती –
सर्वप्रथम करवंदचे देठ काढून घ्या. नंतर करवंद स्वच्छ पाण्याने धुऊन एका सुक्या कपडयाने पुसून घ्या. नंतर करवंदाचे चार काप करून आतमधील बिया काढून टाका. गॅसवर कढई ठेवा. कढईमध्ये तेल टाका. तेल गरम झाल्यानंतर मोहरी, हिंग, हळद, थोडे लाल तिखट, कढीपत्ता टाकून परतून घ्या. त्यामध्ये करवंदाच्या फोडी टाकून एकत्र मिसळून घ्या. थोडावेळ झाकण ठेवून द्या. नंतर त्यामध्ये साखर किंवा गुळ घालून एकत्र करून घ्या. घट्ट पाक तयार होईपर्यंत छान एकत्र करून घ्या. तयार आहे करवंदाचे गोड लोणचे.
हे ही वाचा:
Ranveer Allahbadia ला मागे टाकणारा तो युट्यूबर कोण? महागड्या Youtuber च्या यादीत NO.1
Crickter पांड्याच्या कुटुंबात ‘वायू’ चे आगमन
Follow Us