Sunday, May 12, 2024

Latest Posts

Ranveer Allahbadia ला मागे टाकणारा तो युट्यूबर कोण? महागड्या Youtuber च्या यादीत NO.1

पैसे कमवण्यासाठी प्रत्येकजण मेहनत घेत असतो आणि जो जास्त मेहनत करतो त्याला यश मिळते. देशातला श्रीमंत व्यक्तीच नाव विचारलं तर लगेच अंबानी कुटुंबाचे नाव घेतले जाते. वेल्थ मॅनेजमेंटने आता भारतातील सर्वात महागड्या युट्यूबरचे नाव जाहीर केले आहे. या युट्यूबरचे नाव तन्मय भट्ट (Tanmay Bhatt) असे आहे. तन्मय भट्ट हा सर्वात महागडा युट्यूबर आहे. तन्मयची एकूण संपत्ती ६५० कोटींपेक्षा जास्त आहे. तन्मयची संपत्ती ही बाकीच्या कॉन्टेंट क्रिएटरपेक्षा (Content Creater) जास्त आहे.

भुवन बामची (Bhuvan Bam) एकूण संपत्ती १२२ कोटी रुपये आहे. युट्यूबर कॅरी मिनाटीची संपत्ती ही ५० कोटी इतकी आहे. रणबीर इलाहाबादिया (Ranveer Allahbadia) हा प्रेरणादायी (Motivational) कथांसाठी ओळखला जातो. रणबीरची एकूण संपत्ती ५८ कोटी रुपये आहे. तन्मयचे सोशल मीडियावर भरपूर चाहते आहेत. “नेटवर्थची ही संख्या खूपच कमी आहे. माझ्यासाठी तरी कमी आहे”. पुढे हसण्याचा ईमोजी टाकला आहे. असे तन्मयने पोस्ट शेअर करत सांगितले आहे.

तन्मय भट्ट २०१८ मध्ये Amazon Prime चालू असलेला शो कॉमिकस्टान या स्टँड-अप कॉमेडी सीजन १ चा परीक्षक होता. तन्मय भट्ट भारतीय YouTuber, कलाकार आणि निर्माता, अभिनेता, विनोदकार आहे. ऑल इंडिया बकचोड या क्रिएटिव्ह एजन्सी संस्थापक गुर सिमरनजीत सिंहबरोबर माजी सीईओ होता.

हे ही वाचा:

Taarak Mehta Ka Ooltah Chashmahचा सोढी गेला तरी कुठे? घरच्यांच्या चिंतेत वाढ

Crickter पांड्याच्या कुटुंबात ‘वायू’ चे आगमन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss