उन्हाळा आला की घशाला कोरड पडते त्यामुळे उन्हाळ्यात जेवायची इच्छा होत नाही. तेलकट लोणचं, पापड खायला पण कंटाळा येतो. बाजारात उन्हाळयात भाज्या पण ताज्या नसतात. दररोज डाळ-भात, मेथी, पालक, भेंडी अशा अनेक प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो त्यामुळे कैरीची चटणी एकदा बनवून पहा… यामुळे तोंडाला चव देखील येईल. ही चटणी चवीला आंबट, गोड लागेल पण जेवायला मज्जा येईल.चला तर मग जाणून घेऊयात कैरीची चटणी कशी करावी.
साहित्य –
- कैरी
- टोमॅटो
- जिरे
- मोहरी
- बारीक चिरलेला कांदा
- कढीपत्ता
- हिंग
- लाल तिखट
- गुळ
कृती –
सर्वप्रथम टोमॅटो आणि कैरीचे मध्यम तुकडे करून घ्या. थोडे तेल टाकून हलके तेलामध्ये परतवून घ्या. एका ताटामध्ये टोमॅटो आणि कैरीचे तुकडे काढून घ्या. नंतर चॉपरच्या सहाय्याने टोमॅटो आणि कैरी बारीक करून घ्या. एका कढईमध्ये फोडणीसाठी थोडे तेल टाका. त्यामध्ये जिरे, मोहरी, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, हिंग, लाल तिखट टाकून चांगले एकत्र करून घ्या. नंतर त्यामध्ये टोमॅटो आणि कैरीचे बारीक केले तुकडे घालून छान एकत्र करून घ्या. चवीप्रमाणे मीठ टाका. नंतर त्यामध्ये कैरी आंबट असल्यामुळे त्यामध्ये थोडे गुळ टाका. दोन मिनिटे कढईवर झाकण ठेवून द्या. तयार आहे टोमॅटो कैरीची चटणी. ही चटणी चपाती किंवा वरण भातासोबत तोंडी लावू शकता.
टिप – चटणी तयार करताना पाणी टाकू नये ती केवळ वाफेवर शिजवून घ्यावी.
हे ही वाचा:
Mother’s Day का साजरा करतात तुम्हाला माहिती आहे का?
साबुदाण्याची खिचडी तर सर्वानाच माहिती आहे , पण कधी साबुदाण्याचे पराठे ट्राय केलेत का?
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.