Sunday, May 19, 2024

Latest Posts

साबुदाण्याची खिचडी तर सर्वानाच माहिती आहे , पण कधी साबुदाण्याचे पराठे ट्राय केलेत का?

सकाळी नाश्ता करणे गरजेचे आहे. सकाळी जर पोट भरलेले असेल तर दिवस चांगला जातो आणि दिवसभर स्फूर्ती राहते. इतर कामाच्या गडबडीत सकाळचा नाश्ता बनवणे सोपे नसते. त्यामुळे नाश्तामध्ये काय  बनवायचं हा प्रश्न गृहिणीन नेहमी पडतो. इडली, उपमा , डोसा नेहमी नाश्तामध्ये बनवला जातो. साबुदाण्यापासून तर नेहमी खिचडी तयार केली जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? साबुदाण्यापासून अनेक पदार्थ बनवू शकतो. साबुदाण्यापासून पराठेसुद्धा आपण बनवू शकतो. हे पराठे चवीला चविष्ट आणि शरीराला पण चांगले असतात.साबुदाण्याचे पराठे कसे तयार करायचे चला तर मग जाणून घेऊयात.

साहित्य –

  • साबुदाने
  • जिरे पूड
  • आल्याची पेस्ट
  • कोथिंबीर
  • लिंबाचा रस
  • शेंगदाण्याचे कुट
  • बटाटे
  • तेल

कृती –

सर्वप्रथम साबुदाने स्वच्छ धुऊन घ्या. दोन ते तीन तास भिजवत ठेवा. बटाटे पण चांगले उकडून घ्या. नंतर एका भांड्यामध्ये बटाटे स्मॅश करून घ्या. त्यामध्ये साबुदाने टाकून एकत्र चांगले मिसळून घ्या. त्या मिश्रणात जिरे पूड, आल्याची पेस्ट, कोथिंबीर, लिंबाचा रस, शेंगदाण्याचे कुट, घालून चांगले एकत्र मळून घ्या. एक गोळा माळून घ्या. हाथावर पराठासारख धापून घ्या. पराठा तयार करताना दोन्ही हातांच्या तळाला तेल लावून घ्या. तयार केले पराठा गरम तव्यावर टाका. दोन्ही बाजूला तेल सोडून छान सोनेरी रंगयेईपर्यंत भाजून घ्या. तयार आहे गरमागरम साबुदाण्याचा पराठा. हे पराठे दहीसोबत खाऊ शकता.

हे ही वाचा:

उन्हाळ्यात आंब्यापासून बनवा ‘हे’ पदार्थ, अगदी कमी वेळात स्वादिष्ट पदार्थ.

उन्हाळ्यात आपल्या बागेतील झाडांची अशी घ्या काळजी…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss