Saturday, July 27, 2024

Latest Posts

थंडीत जर तुम्हाला गोड खायची इच्छा झाली तर नक्की करून पहा मूग डाळ हलवा

थंडीच्या दिवसात आपली भूक वाढलेली असते.

थंडीच्या दिवसात आपली भूक वाढलेली असते. या दिवसांमध्ये आपण जे काही पदार्थ खातो ते आपल्या अगदी सहज पचतात. त्यामुळे नेहमीपेक्षा थोडे तेलकट, गोड पदार्थ आपण नक्की खाऊ शकतो. हवेत असलेल्या गारठ्यामुळे आपली पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. कधी कधी आपल्या जेवणात गोड पदार्थ खावासा वाटतो. अश्या वेळी बाहेरून पदार्थ विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी झटपट तयार करू शकतो. गोड बनवायचं म्हंटल की आपल्याकडे दोनच पर्याय असतात शिरा नाहीतर खीर हेच पदार्थ आपण बनवतो. या दोन पदार्थांशिवाय तुम्हला जर काही बनवायचं असेल तर तुम्ही मुगाच्या डाळीचा हलवा बनवू शकता. मुगाच्या डाळीतून आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रोटिन्स मिळतात.हा हलवा नेमका कसा बनवायचा याची रेसिपी आम्ही तुम्हला सांगणार आहोत. चला तर पाहुयात.

साहित्य:-

मूग डाळ १ वाटी
तूप आवश्यकतेनुसार
साखर पाऊण वाटी
बदाम, पिस्ता
वेलची पावडर
केशर
दूध पाव वाटी

कृती:-
सर्वप्रथम मूग डाळीचा हलवा बनवण्यासाठी कढईमध्ये पिवळी मुगाची डाळ लाकसर भाजून घ्या. भाजून थंड करून झाल्यानंतर डाळ मिक्सर मधून ओबडधोबड वाटून घ्या. त्यानंतर कढईत आवश्यकतेनुसार तूप टाकून गरम करण्यासाठी ठेवा. तूप गरम झाल्यानंतर त्यात वाटलेली डाळ टाकून चांगली परतून घ्या. तुपावर डाळ लालसर भाजून झाल्यानंतर साखर आणि दूध सगळं एकजीव करून घ्या. त्यानंतर त्यात बदाम, पिस्ता,वेलची पावडर,केशर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. एक वाफ काढून झाल्यानंतर तयार आहे मुगाच्या डाळीच्या हलवा.

हे ही वाचा:

समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून अशांतता पसरवणे आहे ; गोपीचंद पडळकर

पर्यटनासाठी गेलेल्या पुण्यातील चार विद्यार्थिंनीचा देवगडच्या समुद्रात बुडून मृत्यू

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss