पुणे शहरातून निगडी येथील सैनिक अकॅडमीमधील काही विद्यार्थी सहलीसाठी पर्यटनाला गेले होते. हे विद्यार्थी सहलीचा आनंद लुटत असताना त्यातील सहा जण देवगडच्या समुद्रामध्ये पोहण्यासाठी उतरले. पोहण्यासाठी ते खोल समुद्रामध्ये गेले. तिथे त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सहा जण समुद्रामध्ये बुडाले. त्यातील चार विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. एकाला वाचवण्यात यश आले आहे. परंतु एकजण बेपत्ता आहे. पुण्यातील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल देवगड येथे समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेली होती. तेव्हा ही दुर्घटना घडली. त्यातील चार मुलींचा मृत्यू झाल्यानंतर ग्रुपमधील सर्वांना अश्रू आवरता आले नाही. सर्वांनी हंबरडा फोडला. त्यांचा आक्रश ह्रदय पिळवटून लावणारा होता. देवगडच्या समुद्रामध्ये पहिल्यांदाच अशी दुर्घटना घडली आहे.
देवगड समुद्रकिनारी काही विद्यार्थी पवनचक्की येथून खाली देवगड बीचवर उतरले. तिथे गेल्यानंतर त्यांना समुद्रात अंघोळ करण्याचा मोह आवरला नाही. त्यानंतर ते समुद्रात पोहण्यासाठी गेले. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले. विद्यार्थी बुडत असल्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी आरडाओरड सुरु केला. त्यावेळी लगेच तेथील स्थानिक नागरिकांनी घटना स्थळी धाव घेतली. जीवरक्षक घटनास्थळी दाखल झाले. नी पाण्यात उतरुन प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे, राम डिचोलकर यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला. पण त्यांचे हे प्रयत्न अपुरे पडले. त्या विद्यार्थिनींना देवगड ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले.
पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या विद्यार्थिनी बुडत असताना त्यांना वाचवण्यासाठी रामचंद्र डिचोलकर समुद्रात उतरला. पण तो लाटांमध्ये बेपत्ता झाला. अक्षय तुपे या विद्यार्थ्यास वाचवण्यात यश आले आहे. त्यांचा शोध सुरु आहे. देवगडचा समुद्र किनारा खोल नाही. तसेच तो पर्यटकांसाठी सुरक्षित आहे. परंतु पाण्यात खोल जाऊ नये, असे स्थानिक लोक वारंवार सांगत असतात. पण अनेकदा यांच्याकडे दुर्लक्षित केले जाते. आत्मविश्वासातून काहीजण खोल समुद्रात जातात आणि लाटांमध्ये अडकून बुडतात.
हे ही वाचा:
जालन्यात धनगर समाज आक्रमक, धुळे-सोलापूर महामार्ग टायर पेटवून आंदोलन
कुणबी नोंदींची आकडेवारी जाहीर करू नका; शिंदे समितीची अधिकाऱ्यांना सूचना