Friday, May 3, 2024

Latest Posts

घरच्या घरी बनवा बीटरूट जाम

लहानमुलांना जाम खायला खूप आवडत .

लहानमुलांना जाम खायला खूप आवडत . काहीं मुलं जामच्या बहाण्याने जेवतात. विविध प्रकारचे जाम बाजारात मिळतात . बाजारात असलेले जाम हे शुद्ध साखर, कृत्रिम रंग आणि प्रिझर्वेटिव्ह्जने भरलेले असतात. हे जाम आरोग्यसाठी चांगले नसतात. बाजारातले जाम फक्त जिभेवरची चव भागवू शकतात. पण ते शरीराला पोषक घटक देऊ शकत नाही. बीटरूट मध्ये सोडियम(Sodium), पोटॅशियम(Potassium), कॅल्शियम(Potassium), फॉस्फरस आणि इतर पोषक घटक असतात. बीटरूट खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच बीटरूटमध्ये लोह जास्त प्रमाणात असते. शरीरातले रक्त वाढण्यास मदत होते. बीटरूट खायला लहानमुल टाळतात. अश्यावेळी तुम्ही त्यांना बीटरूटचा जाम बनवून देऊ शकता. जेणेकरून त्यांच्या शरीराला पोषक घटक मिळतील आणि बीटरूट खायची सवय लागेल. चला तर पाहुयात बीटरूट जाम कसे बनवायचे.

साहित्य –

१. २ बीट्स
२. कप गूळ
३. १ टीस्पून लिंबाचा रस

कृती –

सर्वप्रथम बीट स्वच्छ धुऊन घ्या. नंतर ते त्या बीटचे साले काढून घ्या. त्यानंतर त्याचे छोटे तुकडे करून घ्या. कपभर पाणी घालून कूकरमध्यें ३ शिट्या काढून घ्या. कुकर थंड झाल्यावरती ते बीटरूटचे तुकडे ब्लेंडरच्या भांड्यामध्ये काढून घ्या. बीटरूटच्या तुकड्यांबरोबर लिंबाचा रस टाकून ब्लेंडरमध्ये बारीक वाटून घ्या. हे मिश्रण पॅन मध्ये किंवा एका भांड्यामध्ये मंद आचेवर हलवा. त्यामध्ये बारीक करून गूळ टाका . नंतर त्याला नीट झाकण लावून १० ते १५ मिनिटे शिजवून घ्या. हे मिश्रण अधूनमधून ढवळत राहा. म्हणजे ते मिश्रण करपणार नाही किंवा जळणार नाही. जेव्हा हे मिश्रण जाम सारखे घट्ट होईल तेव्हा गॅस बंद करा. तयार आहे आंबटगोड असे बीटरूट जाम. मिश्रण थंड झालयावरती काचेच्या बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेवू शकता. हे जाम फ्रिजमध्ये १० ते १५ दिवस ताज राहते.

हे ही वाचा:

राजकारणात एन्ट्री करणार का? असा प्रश्न विचारल्यानंतर कपिल शर्माने मांडले आपले मत; म्हणाला..

कर्णधार हार्दिक पांड्याला चाहत्यांनी केले ट्रोल, पोस्ट शेअर करत सोनू सूदने दिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss