Sunday, May 5, 2024

Latest Posts

कर्णधार हार्दिक पांड्याला चाहत्यांनी केले ट्रोल, पोस्ट शेअर करत सोनू सूदने दिली प्रतिक्रिया

अभिनेता सोनू सूद (Actor Sonu Sood) हा त्याच्या अभिनयाबरोबर सामाजिक कार्यामुळेही नेहमीच चर्चेत असतो.

अभिनेता सोनू सूद (Actor Sonu Sood) हा त्याच्या अभिनयाबरोबर सामाजिक कार्यामुळेही नेहमीच चर्चेत असतो. कोविड काळात त्याने केलेल्या कामाची चर्चा अजून केली जाते. सोनू सूदचा “फेतह” चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये तो मुख्य भूमिकेत असणार आहे. आणि त्याने या चित्रपटाचे दिगदर्शन ही केले आहे. त्याचबरोबर “पृथ्वीराज” हा चित्रपटही लवकर प्रदर्शित होणार आहे. त्याने २००२ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट “शहीद” या मध्ये काम करून चित्रपटसृष्टीमध्ये प्रदार्पण केले. चित्रपटाबरोबर तो जाहिरातींमध्ये पण काम करतो. सोनूनं आत्तापर्यंत ७० चित्रपटांमध्ये काम केले आहे.आता हा अभिनेता एक कारणामुळे चर्चेत आला आहे.

आयपीएल २०२४ (IPL 2024) ला सुरुवात झाली आहे.आता मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद हार्दिक पांड्याकडे(Hardik Pandya) दिले आहे. यामुळे मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चे चाहते नाराज दिसत आहेत. मुंबई इंडियन्स चे दोन सामने झाले आहेत. पहिला सामना हार्दिक पांड्या आधी ज्या संघाचा कर्णधार होता.त्या संघासोबत गुजरात टायटन्स (Gujarat Titans) बरोबर आणि दुसरा सामना सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) सोबत झाला. पण दोन्ही वेळेस मुंबई इंडियन्स चा पराभव झाला. त्यामुळे हार्दिक पांड्याच्या कर्णधार पदावरती नाराजी व्यक्त केली आहे.

या सगळ्या गोष्टींवरती सोनू सूदने आपले मत मांडले आहे. आपण आपल्या खेळाडूंचा आदर करायला हवा. हेच खेळाडू आपल्याला आणि आपल्या देशाला अभिमान वाटावा अस काम करत असतात . एक दिवस तुम्ही त्यांना चिअर करता आणि दुसऱ्या दिवशी त्यांनाच नाव ठेवता. त्यामुळे ते कुठेही फेल होत नाहीत. तर यामध्ये आपणच फेल होतो. मला क्रिकेट खूप आवडत. जो माझ्या देशाचं प्रतिनिधीत्व करतो तो प्रत्येक खेळाडू मला खूप आवडतो. त्यामुळे तो कोणत्या फ्रेंचायझीसाठी खेळत आहे, हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. त्याचप्रमाणे तो संघाचा कर्णधार म्हणून खेळत आहे की तो संघातला १५ वा खेळाडू म्हणून खेळत आहे, यानेही फरक पडत नाही. ते आपले हिरो आहेत. असे त्याने म्हंटले आहे.

हे ही वाचा:

लहान मुलांच्या आहारात ‘या’ पदार्थाचा समावेश केल्याने शरीराला होतात फायदे

नाशिकमधून छगन भुजबळांना उमेदवारी मिळण्याची शक्यता; उमेदवारीसाठी माझी मागणी आणि आग्रह..

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss