नाश्तासाठी बनवा हिरव्या मूगाचे पराठे.

साधारणपणे मुलं मूग डाळीचे (Moong Dal) पदार्थ खात नाही.

नाश्तासाठी बनवा हिरव्या मूगाचे पराठे.

साधारणपणे मुलं मूग डाळीचे (Moong Dal) पदार्थ खात नाही. पण मूग डाळ ही आरोग्यासाठी चांगली असते. हिरव्या किंवा सोललेल्या मूगडाळीमध्ये खूप पोषक घटक असतात. त्यामुळे मूगडाळीचा आहारात समावेश केला पाहिजे. तसेच ब आणि क जीवनसत्त्व, कॅल्शियम(Calcium), मॅग्नेशियम(magnesium), फॉस्फरस (Phosphorus) व पोटॅशियम (Potassium) असे घटक मूग डाळीमध्ये असतात.आपल्या रोजच्या आहारात या डाळीचे डाळ (वरण ) बनवत असतो. रोजरोज तेच खाऊन कंटाळा येतो. म्हणून अशीच एक खास मूग डाळीची रेसिपी तुम्हाला सांगणार आहोत.

साहित्य:- 

१ कप सोललेली मूगडाळ
३ ते ४ पाकळ्या लसूण
चिरलेली कोथिम्बिर
१ हिरवी मिरची
एक चमच जिरे
१ कप दही
मीठ


कृती:- 

मूगाचे पराठे बनवण्यासाठी मूग रात्रभर ५ ते ६ तास भिजत ठेव्हा. मूग चांगले भिजून झाल्यावर त्याची साले काढून टाका. एका भांड्यामध्ये मूग डाळ, लसूण, आद्रक, चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, एक चमच जिरे,मीठ, दही आणि पाणी घालून मध्यम पीठ तयार करून घ्या. आता एक नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर तेल किंवा तूप टाका. हे पीठ हळुवारपणे त्यावर पसरवून घ्या. दोन्ही बाजू चांगली सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. हे मूगडाळीचे पराठे तुम्ही सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता.

हे ही वाचा:

अमोल कीर्तिकरांना खिचडी चोर म्हणणाऱ्या संजय निरुपमांना संजय राऊतांनी दिले प्रतिउत्तर, म्हणाले..

मोदी सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, Dhananjay Mahadik यांचा दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version