Thursday, May 9, 2024

Latest Posts

अमोल कीर्तिकरांना खिचडी चोर म्हणणाऱ्या संजय निरुपमांना संजय राऊतांनी दिले प्रतिउत्तर, म्हणाले..

ठाकरे गटाकडून आज लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची उमेदवार यादी जाहीर करण्यात आली.

ठाकरे गटाकडून आज लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची उमेदवार यादी जाहीर करण्यात आली. जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये १७ उमेदवारांची नावे आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या एक्सवरून उमेदवारांची यादी जाहीर केली. जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार वायव्य मुंबईची जागा ठाकरे गटाला दिल्याने संजय निरुपम यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली आहे. तर लवकरच संजय निरुपम आपली भूमिका सादर करणार आहेत. संजय निरुपम यांनी ठाकरे गटाचे उपनेते अमोल कीर्तिकर यांचा खिचडी चोर असा उल्लेख केला. याला संजय राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसचेही पॉकेट्स आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचं तुलनेनं मुंबईत वर्चस्व नाही, हे सत्य स्विकारलं पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. आपल्याला अस्तित्व पाहिजे म्हणून एखाद्या पक्षानं कुठे जागा मागावी, हे आघाडीत ठिक नाही, असे देखील संजय राऊत म्हणाले.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, मला वाटत नाही कुठे नाराजी आहे. आज झालेल्या जागावाटपासाठी हाविकास आघाडीचे सर्व नेते आम्ही दोन-अडीच महिने एकत्र बसून, चर्चा करुन प्रत्येक जागेचा, प्रत्येक भागाचा विचार करुन केलेला आहे. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. काँग्रेसचेही पॉकेट्स आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचं तुलनेनं मुंबईत वर्चस्व नाही, हे सत्य स्विकारलं पाहिजे. आपल्याला अस्तित्व पाहिजे म्हणून एखाद्या पक्षानं कुठे जागा मागावी, हे आघाडीत ठिक नाही, असे संजय राऊत म्हणाले. काँग्रेस ठाकरे गटाला शरण गेले असे वक्तव्य संजय निरुपम यांनी केले होते. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे, मी त्यावर काही बोलणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या भावना असतात, मला एकतरी जागा मिळायला हवी. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे एकही जागा नव्हती. त्यापूर्वीही नव्हती. राज्यात काँग्रेसची एकच जागा होती. आज काँग्रेस १६ जागांवर लढणार असून त्यापैकी १० जागांवर जिंकणार आहे. म्हणजे, गेल्या निवडणुकीतील एक जागा आणि यंदाच्या निवडणुकीत थेट १०जागा, यावरुन काँग्रेस शरण गेली असं कसं म्हणता येईल? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.


पूर्व विदर्भामध्ये आमच्याकडे एकही जागा नाही, त्याला काही उत्तर आहे का? आमची रामटेकची जागा सध्या तिथे विद्यमान खासदार आहेत. ही जागा आम्ही आज जिंकत नाही. गेली २५ ते ३० वर्ष आम्ही ती जागा जिंकतोय. सातत्यानं जिंकत आहोत. ही जागा काँग्रेसला हवी आहे, त्यामुळे आम्ही ती जागा काँग्रेसला दिली. मग आता आम्ही असं म्हणू का? रामटेकमध्ये आम्ही काँग्रेसला शरण गेलो, असे संजय राऊत म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रात आमच्याकडे जागाच नाहीत. कोल्हापूर आमची हक्काची जागा आहे. ३० वर्ष आम्ही ती जागा लढतोय. कधी हरलो, कधी जिंकलो. सिने अभिनेते रमेश देव हेदेखील कोल्हापूरमधून शिवसेनेकडून लढले आहेत. कोल्हापूरची जागा आमचं ठरलं शाहू महाराज लढत आहेत आणि महाविकास आघाडीकडून लढत आहेत, असे देखील संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

ठाकरी विचारांचा वारसा मी जपेन, कारण माझे बाबा…काय म्हणाले Amit Thackeray?

मोदी सरकारवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, Dhananjay Mahadik यांचा दावा

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss