नाश्त्यासाठी बनवा हेल्दी सोयाबीन कटलेट्स

आरोग्यासाठी सोयाबीन (soybeans) हे फायदेशीर असतात.

नाश्त्यासाठी बनवा हेल्दी सोयाबीन कटलेट्स

आरोग्यासाठी सोयाबीन (soybeans) हे फायदेशीर असतात. तसेच सोयाबीन खायला अनेकांना आवडत. सोयाबीनमध्ये पौष्टिकतेचे पॉवरहाऊस असते. प्रथिने आणि इतर जीवनसत्वे सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. सोयाबीनचे रोजच्या आहारात सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच कर्करोगाचा धोका कमी होतो, हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, हृदयाचे आरोग्य वाढते यांसारखे अनेक फायदे शरीराला होता. आपण रोजच्या नाष्टयासाठी पोहे किंवा उपमा हेच पदार्थ खातो. पण अनेकदा या सगळ्या पदार्थांचा आपल्या कंटाळा येतो. अश्यावेळेस तुम्ही सोयाबीनचे कटलेट बनवू शकता. चला तर पाहुयात रेसिपी..

साहित्य:-

२ वाट्या सोयाबीन ,१ उकडलेला बटाटा ,ब्रेडचा चुरा ,अर्धा वाटी कांदा ,आले-लसणाची पेस्ट,हळद ,मीठ ,हिरवी मिरची ,तेल

कृती:-

सर्वप्रथम सोयाबीनचे कटलेट बनवण्यासाठी एका छोट्या टोपात २ वाट्या सोयाबीन पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर सोयाबीन मिक्सर मधून बारीक करून घ्या. नंतर उकडलेले बटाटे चांगल्या पद्धतीने स्मॅश करून घ्या. कुसकरून घेतलेला बटाटा आणि सोयाबीन एकत्र मिक्स करून घ्या. त्यामध्ये आले-लसणाची पेस्ट, मीठ, हळद, हिरवी मिरची आणि कांदा हे सर्व घालून मिक्स करून घ्या. मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर त्यात बेसन घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या. नंतर त्यांचे छोटे गोळे करून त्याचे कटलेट बनवा. कटलेट बनवून झाल्यानंतर गॅसवर कढई किंवा पॅन गरम करायला ठेवा. त्यात तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर सोयाबीन कटलेट ब्रेडच्या चुऱ्यामध्ये बुडवून तेलात तळून घ्या. कटलेट गुलाबी होईपर्यंत तळून घ्या. हे कटलेट तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता.

हे ही वाचा:

पुण्यात OLA आणि UBER चा परवाना RTA ने फेटाळला

झी चित्र गौरव २०२४ सोहळ्यात ‘उषा मंगेशकर’ यांना “जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Exit mobile version