Friday, April 19, 2024

Latest Posts

अंजीर पासून घरच्या घरी बनवा अंजीर हलवा

राज्यभरात सगळीकडे थंडीचा चांगलाच जोर वाढला आहे.

राज्यभरात सगळीकडे थंडीचा चांगलाच जोर वाढला आहे. या वाढत्या थंडीमुळे अनेक आजार वाढण्याची शक्यता असते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. हिवाळ्यात योग्य आहार आणि शरीराला ऊब देणाऱ्या पदार्थांचा समावेश केल्याने शरीराला फायदा होतो. अश्यावेळी अनेकजण ड्रायफ्रुट्स खातात. ड्रायफ्रुट्समध्ये असणारे अंजीर हा पदार्थ सगळ्यांना आवडतो. अंजीरमध्ये अनेक गुणधर्म असतात. हिवाळ्यामध्ये अंजीर शरीराला ऊब देण्याचे काम करते. अंजिरमध्ये एंटीऑक्सीडेंट्स, फायबर, झिंक, मॅगनीज, मॅग्नेशियम आणि आयर्न यांसारखे गुणधर्म आढळून येतात. पण जर तुम्हाला अंजीर नुसतं खाण्यासाठी आवडत नसेल तर तुम्ही त्याचा हलवा देखील बनवू शकता. तर आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवता येईल असा अंजिराच्या हलव्याची रेसिपी सांगणार आहोत.

साहित्य :-

सुखे अंजीर
तूप
अर्धा कप बदामाचे काप
मिल्क पावडर
अर्धा वाटी साखर
वेलची पावडर


कृती:-

सर्वप्रथम अंजीराचा हलवा बनवण्यासाठी उकळत्या पाण्यामध्ये अंजीर टाकून ३ ते ५ मिनिटांसाठी ते उकळून घ्या. उकळून झाल्यानंतर अंजीर थंड करण्यासाठी ठेवा . त्यानंतर त्याचे बारीक तुकडे करून घ्या. नंतर गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार तूप टाकून गरम करून घ्या. तूप गरम झाल्यानंतर त्यात बदामाचे काप किंवा इतर ड्रायफ्रुट्सचे तुकडे मंद आचेवर भाजून घ्या. हे सर्व भाजून झाल्यानंतर त्यात अंजीरचे तुकडे, मिल्क पावडर, अर्धा कप पाणी आणि साखर एकत्र करून मिक्स करून घ्या. हे सर्व मिश्रण ५ मिनिटांपर्यंत शिजवून घ्या. नंतर त्यात चवीनुसार वेलची पावडर टाकून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. तयार आहे गरम गरम अंजीरचा हलवा.

हे ही वाचा: 

शिवजयंती कार्यक्रमांसाठी समाज माध्यमांचा योग्य उपयोग करावा- Sudhir Mungantiwar

माझा प्रवेश म्हणजे PM MODI यांच्या विकसित भारत संकल्पाला माझे समर्थन – ASHOK CHAVAN

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss