Spicy Chilli Oil Ramen बनवा फक्त १० मिनिटात; जाणून घ्या ही सिक्रेट रेसिपी

स्पायसी चिल्ली ऑइल रॅमन (Spicy Chilli Oil Ramen) ही एक कोरियन डिश आहे. सध्या भारतात चायनीज पदार्थांसोबतच कोरियन पदार्थ ही लोकप्रिय होत आहे. त्याला कारण म्हणजे केपॉप (Kpop). केपॉप म्हणजेच कोरियन पॉप (Korean Pop) हा एक गाणं आणि नृत्याचा प्रकार आहे.

Spicy Chilli Oil Ramen बनवा फक्त १० मिनिटात; जाणून घ्या ही सिक्रेट रेसिपी

स्पायसी चिल्ली ऑइल रॅमन (Spicy Chilli Oil Ramen) ही एक कोरियन डिश आहे. सध्या भारतात चायनीज पदार्थांसोबतच कोरियन पदार्थ ही लोकप्रिय होत आहे. त्याला कारण म्हणजे केपॉप (Kpop). केपॉप म्हणजेच कोरियन पॉप (Korean Pop) हा एक गाणं आणि नृत्याचा प्रकार आहे. केपॉप हे आज तरुणाई मध्ये खूप प्रसिद्ध झाले आहे. भारतातच नव्हे तर जगभरात केपॉप चे चाहते आहेत. केपॉप सोबतच केब्युटी (k – Beauty) सुध्दा तितकीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आजकालच्या तरुणाईला कोरियन देशाबद्दल, तिथल्या लोकांबद्दल, तिथल्या संस्कृती बद्दल तसेच तिथल्या पदार्थांबद्दल खूप आकर्षण निर्माण झाले आहे. स्पायसी चिल्ली ऑइल रॅमन (Spicy Chilli Oil Ramen) ही एक कोरियन डिश असून तुम्हाला ती खाण्यासाठी साऊथ कोरियाला जाण्याची गरज नाही किंवा कोणत्या महागड्या रेस्टोरंट (Restaurant) मध्ये जाण्याची गरज नाही. कारण ही कोरियन डिश तुम्हाला घरी सुध्दा बनवता येईल ते पण अगदी १० मिनिटात. चला तर मग जाणून घेऊया या खास डिशची रेसिपी.

स्पायसी चिल्ली ऑइल रॅमन यासाठी लागणारे साहित्य –

स्पायसी चिल्ली ऑइल रॅमन यासाठी लागणारी कृती –

सर्वप्रथम गॅस चालू करून एका पातेल्यात इन्स्टंट नूडल्स टाकून ते साधारण ४ ते ५ मिनिटे उकळवून घ्या. नूडल्स लवकर शिजण्यासाठी तुम्ही त्यावर झाकण ठेवू शकता.

त्यानंतर एक बाउल घ्या त्यामध्ये चिरलेली लसूण, स्प्रिंग ओनिअन्स, कोथिंबीर, तीळ, आणि इन्स्टंट नूडल्स चा मसाला टाकून त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.

त्यानंतर एक तवा घ्या आणि त्यात तेल गरम करून ठेवा. त्यानंतर गरम गरम तेल हे त्या मिश्रण असलेल्या बाउल मध्ये ओता. त्यानंतर उकळवून घेतलेले नूडल्स त्या बाउल मध्ये टाका आणि एकदम चांगल्याप्रकारे मिक्स करून घ्या. अशाप्रकारे तुमचे स्पायसी चिल्ली ऑइल रॅमन तयार होईल.

या लेखात नमूद केलेल्या पद्धती आणि सूचनांचे अनुसरण करण्यापूर्वी, डॉक्टर किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.

हे ही वाचा : 

बनवा घरच्या घरीच पोहे आणि बटाट्यापासून बनवू खमंग कटलेट

विरघळलेल्या आईस्क्रीमपासून बनवा नवीन चविष्ट पदार्थ

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो कर.

Exit mobile version