Saturday, July 27, 2024

Latest Posts

नाताळच्या सणासाठी घरच्या घरी बनवा स्पॉंजी रवा केक

डिसेंबर महिना म्हणजे नाताळचा महिना.

डिसेंबर महिना म्हणजे नाताळचा महिना. या महिन्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजार पेठा सजलेल्या असतात. या दिवसांमध्ये केक, कुकीज, चॉकलेट, गिफ्ट्स यांची या महिन्यात मोठ्या प्रमाणत खरेदी केली जाते. या नाताळच्या सणामुळे केकला खूप महत्व मिळाले आहे. हा सण इतर धर्मातील लोकही साजरा करतात. नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आवर्जून केक कापला जातो. बाजारात मिळणारे केक महाग असतात आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मैदा वापरला जातो. अश्यावेळी घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये आपण रवा केक बनवू शकतो. तर आज आपण कुकरमध्ये अगदी कमी वेळात कमी साहित्यामध्ये तयार होणारा रवा केकची रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य:-

२ वाटी रवा
१ वाटी दही
पिठी साखर १ वाटी
१ वाटी दूध
तूप पाव वाटी
व्हेनेला इसेन्स
बेकिंग पावडर
बेकिंग सोडा
ड्रायफ्रूट

कृती:-

रवा केक बनवण्यासाठी तूप घालून त्यात एक वाटी साखर घालून फेटून घ्या. हे दोन्ही नीट एकजीव करून घ्या. त्यानंतर त्यात रवा आणि दही घालून पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. नंतर त्यात दूध आणि व्हेनेला इसेन्स घालून पुन्हा एकदा एकजीव करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर हे मिश्रण अर्धा तास झाकून ठेवा. कुकरमध्ये मीठ किंवा बेकिंग सोडा घालून त्यावर केकचे भांडे ठेवून १० मिन कुकर प्री हिट करण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर बाजूला ठेवलेल्या मिश्रणात बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर टाकून पुन्हा एकदा मिक्स करा. नंतर त्यात आवडीनुसार सुकामेवा टाकून घ्या. कुकरच्या भांड्याला तेल किंवा तूप लावून ते मिश्रण त्यात ओतून घ्या. गॅस सुरु करून प्री हिट झालेल्या कुकरमध्ये ३५ ते ४० मिनिट केक बनवण्यासाठी ठेवा. केक थंड होण्यासाठी १० ते १५ मिनिट ठेवून घ्या. थंड झाल्यावर केक कडेने मोकळा होतो.

Latest Posts

Don't Miss