Saturday, July 27, 2024

Latest Posts

गुलाबापासून बनवा घरच्या घरी ‘या’ स्वीट डिशेस,जाणुन घ्या

गुलाब हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते.गुलाबाच फुल देऊन आपण आपल्या पार्टनरला आपल्या प्रेमाची कबुली देतो

गुलाब हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते.गुलाबाच फुल देऊन आपण आपल्या पार्टनरला आपल्या प्रेमाची कबुली देतो,खरतर हे प्रेमाचे एक लाल गुलाबाचं फुलं आपलं नव नातं निर्माण करत.आपल्याला हे सगळ तर माहिती आहे.मात्र या गुलाबाच्या फुलाचा उपयोग स्विट डिशेस बनवण्यासाठी देखील होतो.हे खुप कमी लोकांना माहिती आहे की, गुलाबाच्या फुलाचा उपयोग हा गोड पदार्थ बनवण्यासाठी देखील होत असतो.. ही गोड मिठाई खाल्ल्यानंतर तुमच्या जोडीदाराचे मन प्रसन्न होईल.तर जाणुन घ्या या ५ स्विट डिशेस

बर्फी

गुलाबाच्या पाकळ्यांपासून खास प्रकारची बर्फी बनवणं खूप सोपं आहे.  तुम्ही ते दोन प्रकारे बनवू शकता. पहिली म्हणजे तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या वापरू शकता आणि दुसरे म्हणजे बर्फी बनवण्यासाठी तुम्ही रोज इसेंस घालू शकता. बर्फी थोडी चविष्ट बनवण्यासाठी तुम्ही त्यात ड्रायफ्रुट्सही घालू शकता.

कुकीज

गुलाबापासून तुम्ही कुकीजही बनवु शकता.तुम्ही अनेक प्रकारच्या कुकीज खाल्ल्या असतील, पण या रोज डेच्या दिवशी गुलाबापासून बनवलेल्या कुकीज ट्राय करून पाहा आणि तुमच्या प्रियकराचे मन जिंका. हे बनवणे इतर कुकीज प्रमाणे सोपे आहे. कुकीच्या बॅटरमध्ये गुलाबाच्या पाकळ्या मिसळून तुम्ही हे बनवू शकता.

गुलाबाची खीर

गोड पदार्थ कोणाला आवडत नाहीत आणि खीर म्हंटल की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. परफेक्ट गुलाबाची खीर बनवण्यासाठी तुम्ही शेफ अजय चोप्रा यांनी दिलेल्या रेसिपी फॉलो करू शकता. हे खायला इतके चविष्ट आहे की तुमचा पार्टनर खूश होईल.

गुलाब फिरनी

तुम्हाला उत्तम गुलाब फिरनी बनवायची असेल, तर शेफ संजीव कपूर यांनी दिलेल्या रेसिपी फॉलो करा. हे बनवायलाही सोपे आहे. तुम्ही पिठात रोज इसेंस मिक्स करू शकता आणि गुलाबाची फिरणी सजवू शकता.

गुलाबाचा हलवा

गाजरचा हलवा तर आपण नेहमी खातो,मग आता गुलाबाचा हलवा बनवाजर तुमच्या जोडीदाराला गोड पदार्थ आवडत असतील, विशेषत: हलवा, तर या दिवशी त्याला तुमच्या स्वत:च्या हातांनी गुलाबपासून बनवलेला हलवा नक्कीच खायला द्या. ते तयार करणे खूप सोपे आहे.

हे ही वाचा:

एका व्यक्तीनं मला कॉम्प्रमाइज करायला…अंकिताने सांगितला कास्टिंग काउचचा अनुभव

सीएम केजरीवाल यांना कोर्टाचा धक्का, ईडीच्या अर्जावर १७ फेब्रुवारीपर्यंत हजर राहण्याचे आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss