उन्हाळ्यात आंब्याचा उपयोग करून उकडीचे मोदक बनवा हटके स्टाईलने…

ची आंब्याला फळांचा राजा मानले जाते. हा फळाचा राजा येण्याची सर्वजण वर्षभर वाट बघत असतात. उन्हाळ्यात आंबा खाण्यासाठी प्रत्येकजण आतुर असतो. प्रत्येकाआंबा खाण्याची स्टाईल ही वेगळी असते.

उन्हाळ्यात आंब्याचा उपयोग करून उकडीचे मोदक बनवा हटके स्टाईलने…

आंब्याला फळांचा राजा मानले जाते. हा फळाचा राजा येण्याची सर्वजण वर्षभर वाट बघत असतात. उन्हाळ्यात आंबा खाण्यासाठी प्रत्येकजण आतुर असतो. प्रत्येकाची आंबा खाण्याची स्टाईल ही वेगळी असते. काही जणांची पसंती ही आंबे कापूण खाण्यात असते तर काही जणांची पसंती त्याचा रस बनवून पिण्यात असते. तर काही खवय्यांची पसंती ही आंब्यांचे विविध नवीन पदार्थ बनवून ते चवीने खाण्यात असते. अश्यातच एक नवीन आंब्याची रेसिपी आम्ही आज तुमच्या साठी घेऊन आलो आहोत.

आपण आंब्याच्या फ्लेवरचे मावा मोदक खातो. पण उकडीच्या मोदकांमध्ये आपण आंब्याचा फ्लेवर क्वचितच ट्राय केला असेल. नेहमीच्याच उकडीच्या मोदकांना थोडासा ट्विस्ट देऊन हे मोदक होत असल्याने त्यासाठी खूप वेगळं काहीतरी करावं लागतं असं काही नाही. मोदक हा अनेकांचा विक पॉईंट असतो. पाहूयात हे झटपट होणारे मँगो फ्लेवरचे उकडीचे मोदक कसे बनवायचे

आंबा मोदकांसाठी लागणारे साहित्य –

आंबा मोदक तयार करण्यासाठी पुढील कृती करावी –

सर्वात प्रथम एका पातेल्यात साधारण १ ते २ कप पाणी घेऊन ते गरम करायला ठेवा. त्यामध्ये १ वाटी आंब्याचा रस आणि केशराच्या काड्या घालायच्या. हे सगळे चांगले शिजवून घ्यायचे आणि उकळी आली की त्यामध्ये थोडे मीठ आणि तूप घालायचे.

त्यानंतर यात तांदळाचे पीठ घालून मिश्रण चांगले ढवळून एकजीव करुन घ्यायचे. उकड मुरण्यासाठी त्यावर झाकण ठेवायचे आणि गॅस बंद करायचा.

दुसरीकडे सारणाची तयारी करण्यासाठी एका पॅनमध्ये तूप घेऊन त्यात १ वाटी गूळ घालायचा आणि थोडं पाणी घालून गूळ वितळून घ्यायचा. यामध्ये २ वाट्या खोवलेले पांढरे शुभ्र खोबरं घालायचे आणि ते परतून घ्यायचे. यामध्ये १ वाटी आंब्याचा रस आणि वेलची पावडर आणि भाजलेली खसखस घालून हे मिश्रण चांगले घट्टसर होईपर्यंत परतून घ्यायचे.

उकडीवरचे झाकण काढून मिश्रण एका परातीत काढायचे आणि सुरुवातीला एखाद्या डावाने आणि मग हाताने चांगले मळून घ्यायचे. मळलेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करुन मोदकासाठी पाऱ्या करायच्या आणि सारण भरुन मोदक उकडायला ठेवायचे.

अश्या सोप्यापद्धतीतने चविष्ट असे ‘आंबा मोदक’ झटपट तयार होईल.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Exit mobile version