Friday, April 19, 2024

Latest Posts

हिवाळ्याच्या दिवसांत घरी बनवू पाहा बदामाचा शिरा

राज्यभरात सगळीकडे थंडीची लाट आली आहे.

राज्यभरात सगळीकडे थंडीची लाट आली आहे. या थंडीच्या दिवसांमध्ये शरीराला उबदारपणा मिळवण्यासाठी गरम पदार्थ खाल्ले जातात. अनेकदा आपण रव्याचा शिरा बनवून खातो. पण तुम्ही कधी बदामाचा शिरा बनवला आहे का? हिवाळ्याच्या दिवसामध्ये सकाळी लवकर उठून बदामाचा शिरा खावे असे बोलले जाते. बदाम उष्ण असल्यामुळे शरीराला उब मिळते. त्यामुळे हाडांचे दुखणे, त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यास मदत होते. तूप आणि बदाम हिवाळ्यात खाल्ल्याने सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत नाही. त्यामुळे अनेक गुणांनी युक्त बदामाचा शिरा नक्की घरी करून पाहा.

साहित्य :-

१ वाटी बदाम
पाऊण वाटी तूप
पाऊण वाटी साखर
दीड वाटी दूध
वेलची पावडर

कृती:-

सर्वप्रथम आधल्या रात्री एक वाटी बदाम पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भिजलेल्या बदामाची सल्ल काढून घ्या. नंतर त्याची मिक्सरमधून जाडीभरडी पेस्ट करून घ्या. पेस्ट बनवून झाल्यानंतर गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवा. कढई गरम झाल्यानंतर त्यात पाऊण वाटी तूप टाकून ते सुद्धा गरम करून घ्या. तापलेल्या तुपात बदामाची पेस्ट टाकून घ्या. पेस्ट मंद आचेवर गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्यात दूध टाका. मध्यम आचेवर हलवा नीट शिजवून घ्या. दूध आटू लागल्यानंतर त्यात साखर टाकून घ्या. साखर नीट विरघळली कि त्यात वेलची पावडर टाका. त्यानंतर हलवा २ ते ३ मिनिटं शिजवून घ्या. तयार आहे बदामाचा हलवा.

Latest Posts

Don't Miss