ख्रिसमसची लगबग सगळ्याच चर्चमध्ये सध्या पाहायला मिळत आहे. नाताळ निमित्ताने प्रत्येक चर्च सजवण्यात येत आहेत. पण याला अपवाद म्हणून जगात काही असे चर्च आहेत, जिथे २५ डिसेंबर नाही तर ६ जानेवारी या दिवशी नाताळ साजरा केला जातो. काय आहे नक्की कारण? चला जाणून घेऊया.
अर्मेनियामध्ये ग्रेगरीनेच राजाला चर्च बांधण्याचा प्रस्ताव दिला होता. आता अर्मेनिया हे जगातील सर्वात जुने चर्च असल्याचे बोलले जाते. आजच्या युगात अर्मेनिया हा ख्रिश्चन शासित देश बनला आहे.ख्रिसमसच्या निमित्ताने सगळीकडे आनंदाचे वातावरण दिसून येत असते. सजावट, केक आणि सगळीकडे जिंगल बेलच्या आगमनाची आणि गिफ्ट्सची वाट पाहिली जाते.२५ डिसेंबर हा दिवस येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस म्हणून ओळखला जातो. म्हणूनच, या दिवशी ख्रिसमस साजरा केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का, जगात असेही काही चर्च आहेत, जिथे ख्रिसमस २५ डिसेंबर रोजी न करता ६ जानेवारीला साजरा केला जातो.हो, असे काही चर्च आहेत, जिथे ६ जानेवारी या दिवशी ख्रिसमस साजरा केला जातो. असे म्हटले जाते की, ख्रिस्ती धर्माचा उदय येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरच झाला. त्यावेळी आर्मेनियन अपोस्टोलिक चर्चची सुरुवात झाली.चौथ्या शतकात राजा टिरिडेट्सने ख्रिश्चन धर्माला आर्मेनियाचा राज्य धर्म बनवले. त्या राजाने ग्रेगरीला पहिला कॅथलिक बनवले आहे. ग्रेगरीने येशूला पृथ्वीवर उतरताना पाहिले होते, अशी आख्यायिका मानली जाते.असे असले तरीही, अर्मेनियन अपोस्टोलिक चर्चने २५ डिसेंबर ऐवजी ६ जानेवारी या दिवशी ख्रिसमस साजरा करण्याचे ठरवले. याबाबत तज्ज्ञांचे मत वेगळे आहे. ६ जानेवारी या दिवशी एपिफेनी हा सण साजरा केला जातो आणि या सणाच्या निमित्ताने ख्रिसमस साजरा केला जातो.