Friday, May 10, 2024

Latest Posts

राशी भविष्य २० जुलै २०२२

मेष : भाषेतील शालीनता राखावी. इतरांवर तोंडसुख घेण्याची मानसिकता तयार होऊ शकते. आपल्या कामाबाबत आणि दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. तुम्ही तुमच्या दृढ निश्चयी स्वभावामुळे तुमच्या कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

वृषभ : आरोग्य विषयक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. संतुलित आहाराचे सेवन करा. कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करीत असल्यास त्या कामात यश मिळेल. कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हे लक्षात ठेऊन आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. किरकोळ आणि ठोक व्यापाºयांसाठी चांगला दिवस आहे.

मिथुन : नैराश्यावर रामबाण उपाय शोधून काढून सुखी जीवनाकडे वाटचाल सुरु कराल. पैश्याची बचत करण्याचा विचार करा. आपल्या इच्छेप्रमाणे इतरांनी काम करावे अशी अपेक्षा धरू नका. भागीदारांना गृहीत धरू नका. जीवनाच्या धावपळीत आज तुम्ही आपल्या मुलांसाठी वेळ काढाल.

कर्क : आपण ज्यांना आदर्श मानतात अशा महान व्यक्तिमत्वाची भेट होऊ शकेल. कोणत्याही विषयात गुप्तता आवश्यक असते याचे भान असायलाच हवे. कौटुंबिक जीवनात सुखदायक तसेच आल्हाददायक घटना अनुभव कराल.

सिंह : आजचा दिवस विद्यार्थी दशेतील लोकांना महत्वपूर्ण घटना क्रमाचा अथवा धावपळीचा ठरू शकेल. सामाजिक क्षेत्रात सन्मान प्राप्त होऊ शकेल. जोडीदारावरील विश्वास अधिक वृद्धिंगत होतील यासाठी प्रयत्न करा. थोरांचा सल्ला जीवनात महत्वाचा ठरेल.

कन्या : पूर्वी केलेली गुंतवणूक उपयोगी पडू शकेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. भागीदारीसाठी अनुकूल काळ आहे. मित्रपरिवारासाठी वेळ द्यावा लागेल.

तुला : आज तुमच्याबद्दल कोणीतरी द्वेष पसरवू शकतो. आपण स्वीकारलेल्या कामातून स्वतःसाठी देखील वेळ काढणे खूप कठीण आहे. आरोग्यविषयक किरकोळ तक्रारी येऊ शकतील. वॆद्यकीय सल्ला घेऊनच औषधोपचार करावेत.

वृश्चिक : अभ्यास वाढवण्यासाठी नवीन मित्र जोडाल. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल. कामकाजात आज तुमची एका महत्वाच्या महान व्यक्तीशी ओळख होईल. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा.

धनु : काही वेळेला शांत बसने भविष्यासाठी उपयुक्त ठरते. हाच नियम उपयोगी पडेल. अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. कठीण प्रसंगी नातेवाईक देखील तुम्हास मदत करतील. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील.

मकर : तुमचे तर्कशास्त्र वापरून पुढे जात राहा. इतरांसाठी आर्थिक बोजा उचलावा लागेल. तुमच्या खेळकर-खोडकर स्वभावामुळे अवतीभवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. चांगल्या करिअरसाठी स्वीकारलेला मार्ग कार्यान्वित करायला हरकत नाही.

कुंभ : अडकून पडलेली कामे मार्गी लागल्याचे संकेत मिळतील. दूरच्या प्रवासाचे बेत आखाल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि कार्यालयात सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा. झालेले गैरसमज दूर होण्यास, मदतगार वातावरण बनेल.

मीन : आपली सांपत्तिक स्थिती सुधारली असली तरी खर्चाचे प्रमाणही वाढतेच राहिले तर फायदा तोट्याचे अनुमान लावणे कठीण होऊन बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवजात बालकांच्या प्रकृतीची काळजी घेणे आवश्यक आहे.

Latest Posts

Don't Miss