Sunday, May 19, 2024

Latest Posts

राशी भविष्य, ११ जानेवारी २०२३, मनाला आनंद आणि दिलासा मिळाल्याने

आज आपण ठरविलेल्या कामाला अंतिम स्वरूप देण्यात यशस्वी व्हाल. पूर्वग्रह दूषित विषयाला समजून घेऊन त्यातील त्रुटी दूर कराल.

ज्यो. श्री रविंद्र भगवान पाठक

मेष : आज आपण ठरविलेल्या कामाला अंतिम स्वरूप देण्यात यशस्वी व्हाल. पूर्वग्रह दूषित विषयाला समजून घेऊन त्यातील त्रुटी दूर कराल. आपण आज जो विषय हाताळण्याचा प्रयत्न कराल त्याला साचेबंद स्वरूपात परिवर्तित करून नाविन्यपूर्ण रचनात्मक बदल घडवाल. प्रवासातून फायदा होईल. तुमच्या संततीकडून तुम्हाला अभिमान घडेल असे कार्य घडेल. अध्यात्मिक विषयात विश्वास दृढ होईल.
स्त्रीयांसाठी : मुलाबाळांच्या सहवासात आजचा दिवस आनंदात व्यतीत कराल.

वृषभ : घर-कुटुंबासाठी वेळ दिल्याने मानसिक आनंद लाभेल. तुमच्या कामावरची निष्ठा तुम्हाला दर्जा प्राप्त केउन देईल. गुरच सजावटीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तुमच्या मातोश्रीनी दिलेला सल्ला तुम्हाला अत्यन्त उपयुक्त ठरू शकेल. तिचा स्नेह वृद्धिंगत होईल. आजचा दिवस सर्वाना सोबत घेऊन चालण्याचा आहे. मनातील चलबिचल नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करा.
स्त्रीयांसाठी : कामाचा अधिक भार पडण्याची शक्यता आहे.

मिथुन : तुम्ही प्रयत्नशील असलेल्या विषयास आज न्याय मिळेल. त्या विषयाला सफलता प्राप्त झाल्याने मन भरून येईल. विशेष करून आपण जर सरकार दरबारी काम करत असाल तर त्या क्षेत्रात मानसन्मान देखील मिळतील. तुमच्या वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नवा कीर्तिमान स्थापन होण्यासाठी आवश्यक हालचाली आज सुरु होऊन त्या बाबतीत लवकरच अंतिम स्वरूप देण्यात यशस्वी व्हाल.
स्त्रीयांसाठी : तुमचा आत्मविश्वास वाढेल.

कर्क : आजचा दिवस धनलाभाचा आहे. अनेक मार्गाने तुम्हाला उत्पन्नाचे श्रोत सुरु होतील. कायिक-वाचिक-मानसिक स्थिती अत्यन्त अनुकूल राहील. तुमच्या संगतीने इतरांचा देखील फायदा होईल. आपण जर घर – जमीन – वाहन खरेदीचा विचार करीत असाल तर त्याविषयी आज भरपूर प्रगती होईल. प्राकृतिक कारणाने थोड्याफार प्रमाणात मानसिक दुर्बलता वाढण्याची शक्यता आहे.
स्त्रीयांसाठी : कौटुंबिक जीवनात आनंदी रहाल.

सिंह : आज तुम्ही सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात अधिक व्यस्त रहाल. तुमच्यावर अधिक जबाबदाऱ्यांचा भर पडू शकतो. त्याचे निर्वहण करण्यासाठी तुम्ही सक्षम बनाल. आजचा दिवस इच्छा – भावना यावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. काही ठोस आणि धोरणात्मक निर्णय देखील घ्यावे लागतील. समुद्राच्या भरती ओहोटीच्या वेळेलप्रमाणे तुमच्या दिनचर्येत उलथापालथ देखील घडून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विसंबून राहू नका.
स्त्रीयांसाठी : तुमच्या कामाची गती अधिक असेल.

कन्या : तुम्ही आज व्यापारातील प्रत्येक पाऊल अभ्यासपूर्ण टाकले पाहिजे. आर्थिक बाबतीत होणारी गुंतवणूक तुम्हाला नुकसान वाढवू शकते. शक्यतो भाग भांडवली बाजारातील हालचालीवर लक्ष केंद्रित करूनच त्यात गुंतवणूक करा. आजारी मंडळींना शारीरिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल. विरोधक मंडळी आज तुमच्या विरोधातील संधीचा फायदा उचलू शकतात. अशा विषयात आपण सतर्क रहावे.
स्त्रीयांसाठी :मनाची घालमेल वाढेल.

तुळ : तुम्हाला आज प्रेमळ लोकांची सांगत लाभेल. विवाहासाठी इच्छूक मंडळींना त्यांच्या मनाप्रमाणे स्थळ येतील. मात्र मानवी जीवनात कोणतीही निश्चितता नसते हे ध्यानात घेऊनच सकारात्मक चर्चा केल्यास तुम्ही निवडलेल्या विषयी उत्तम प्रतिसाद मिळेल. अति भावुक होणे टाळा. तुमच्यातील कला गुणांना संधी उपलब्ध होणार आजचा दिवस आहे.
स्त्रीयांसाठी : मनाला आनंद आणि दिलासा मिळाल्याने आत्मिक समाधानासोबतध भौतिक समाधान देखील लाभेल.

 

वृश्चिक : आजचा दिवस तुम्हाला तुमच्या कामाला – क्षेत्राला न्याय देण्याचा आहे. त्यासाठी आवश्यक ती मेहनत करण्याची तयारी ठेवा. तुमच्या कामातील सातत्य हाच गुण आजचा दिवसात तुम्हाला इच्छित प्राप्तीसाठी सरलता निर्माण करील. व्यसनाधीनतेकडे जाणारा कल तुम्हाला तुमच्या जीवनात बदनामीचे बक्षीस देऊ शकतो, त्यापासून आपण आपला बचाव करायलाच हवा.
स्त्रीयांसाठी : ठोस भूमिका मांडत असताना ती मांडण्याची शैली चुकीची असेल.

धनु : सार्वजनिक क्षेत्रात अथवा व्यासपीठावरून केलेले वक्तव्य इतरांना दिलासादायक असेल. तुमचे धैर्य वाढेल अशी अनुकूल स्थिती – परिणाम दिसून येतील. शारीरीक कमजोरी तुमच्या कामातील अडथळ्यांचे कारण बनू शकेल. म्हणून तुम्ही योग्यवेळीच वैद्यकीय सल्ला घेऊन त्यादिशेने उपचार पद्धती अवलंबणे गरजेचे आहे. मधुमेही किंवा चर्मरोगी व्यक्तींनी याबाबत काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
स्त्रीयांसाठी : संतती सुख लाभेल.

मकर : तुम्ही तुमच्या विचारावर ठाम राहण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सारखी विचलित मानसिकता तुम्हाला ध्येयापर्यंत पोहोचण्यास अडथळा ठरू शकते. उंचवटा -टेकडी अथवा खोल पाणी अशाठिकाणी जाणे टाळावे. वाहन चालवताना संयमित गती राखावी. तुमच्या भावनेला ठेच पोहोचेल अशा घटना देखील आज घडू शकतात. मात्र या गोष्टी क्षणिक असतात हा विचार मनात जागृत ठेवल्याने तुम्हाला दिलासा मिळू शकेल.
स्त्रीयांसाठी : कटुता संपण्यासाठी पाऊल उचलावे.

कुंभ : तुमचे सहकारी मित्र तुम्हाला सहकार्य करतील. तुमच्या प्रेमळ स्वभावाने इतरांची मने सहज जिंकू शकाल. आपणही इतरांशी सहयोगाची भूमिका घेतल्याने आजच्या दिनचर्येत सहजता आणि सरलता येऊन सामीप्य आणि समाधानाची दिव्य अनुभूती घेऊ शकाल. भागीदारीतील व्यवसायात दोन पेक्षा अधिक भागीदार एकत्र येऊन व्यवसायाची नांदी करू शकाल.
स्त्रीयांसाठी :तुम्हाला हवे ते प्राप्त होईल.

मीन : अधिक परिश्रमाने थकवा जाणवेल. तुमचे शरीर जर कमजोर असेल तर तात्काळ उपचार करण्याची गरज आहे याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे उर्वरित आयुष्याचा क्षय करण्यासारखेच आहे. कर्करोग-कमी रक्तदाब-मधुमेही लोकांनी आपली काळजी घेणे आवश्यक आहे. तुमच्या मुखातून चुकून निघालेला शाब्दिक बाण भांडणतंट्याचे कारण बनू शकेल. तुमच्या आजोळच्या मंडळींकडून उत्तम सहयोग मिळेल.
स्त्रीयांसाठी : आवश्य्क त्या गोष्टीतच खर्च करा.

 

Latest Posts

Don't Miss