Tuesday, May 21, 2024

Latest Posts

राशी भविष्य Horoscope Today 27 July 2022 आज तुमची मानसिकता ठोस आणि धोरणात्मक निर्णयाकडे जाणारी असेल

मेष : सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाल्याने आजचा दिवस आनंदात जाईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अनेक प्रकारचे समाधानकारक संदर्भ प्राप्त होऊ शकतील. आपण जर वरिष्ठ पदावर कार्यरत असाल तर तुमचे सहयोगी हसत मुखाने तुमच्या आदेशाचे पालन करतील.

वृषभ : निसर्गरम्य ठिकाणच्या सहलीमध्ये सहभागी व्हाल. तीर्थयात्रा किंवा ऐतिहासिक वास्तू /नगर याविषयीचे संदर्भ कुतूहलाने संकलित करू शकाल. पारिवारिक स्नेह संबंध अधिक दृढ व्हावेत यासाठी प्रयत्नशील व्हाल. तुमच्या प्रयत्नांना काहीअंशी यश देखील मिळू शकेल.

मिथुन : आपली कर्तव्ये – जबाबदाऱ्या नेटाने पार पाडण्याचा प्रयत्न कराल. मनाला दिलासा देणाऱ्या घटना घडल्याने नवचैतन्य प्राप्त होईल. मित्र परिवाराच्या सहाय्याने अडकून पडलेल्या कामांना गती देऊ शकाल. व्यावहारिक ज्ञानाची प्राप्ती होईल.

कर्क : मनाला विचलित करणाऱ्या घटना ऐकायला मिळू शकतात. पूर्वीच्या कळत आपण ज्यांना सहकार्य केले आहे आणि तुमच्या अडचणीत त्यांच्या विश्वासावर कोणते निर्णय घेत असाल तर त्यात पश्चातापाशिवाय काहीही हाती लागणार नाही. आरोग्यविषयक किरकोळ तक्रारी वाढू शकतात.

सिंह : आपल्याला आज लाभाच्या पदावर नियुक्त केले जाऊ शकते. वडीलधाऱ्या व्यक्तीकडून आदर-सन्मानाने वागणूक मिळेल. समाजामध्ये स्वकर्तृत्वाने आपले स्थान निर्माण झाल्याचा मनस्वी आनंद प्राप्त होईल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत खुशीचा ठरू शकेल.

कन्या : आपण स्वीकारलेल्या उद्योग व्यवसायात अधिक प्रगतीसाठी केलेल्या चर्चा सफलतेकडे घेऊन जाण्यास सुरुवात होईल. घरगृहस्थी मध्ये सुखसमाधानचे वातावरण बनेल. मंगलकार्याविषयी सकारात्मक चर्चा घडून येतील . स्थावर मालमत्तेविषयी सुयोग्य निर्णय होऊन दिलासा मिळेल.

तुला : आपल्या स्वाभाविक गुणांमुळे तुलनात्मक अथवा स्पर्धात्मक विषयात स्वारस्य वाढेल. वादविवादात प्रभावी भूमिका मांडण्याचा प्रयत्न कराल. धार्मिक विधिविधानाबाबत चर्चा करून मुहूर्त निश्चित होईल. न्यायालयीन क्षेत्रामध्ये आज समाधानकारक प्रगती दिसून येईल.

वृश्चिक : आज तुमची मानसिकता ठोस आणि धोरणात्मक निर्णयाकडे जाणारी असेल. तुमच्या शब्दप्रहाराने जवळच्या लोकांच्या मनावर आघात होऊ शकेल, त्यामुळे क्रोधावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरेल. खोल पाण्याकडे जाण्याचे टाळावे. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

धनु : घरातील वातावरण मंगलमय बनेल. विवाह इच्छूकांसाठी आजचा दिवस इच्छापूर्तीचा आहे. व्यावसायिक भागीदार किंवा कौटुंबिक भागीदार एकमेकांच्या सहकार्याने प्रगतीचे पाऊल टाकू शकाल. आपली वैचारीक क्षमता देखील वृद्धिंगत होईल. अनेकांना सामावून घेण्याची क्षमता देखील वाढेल.

मकर : शारीरिक कमजोरी जाणवेल. आपण ज्यांना आपले समजत होता त्याच अतिविश्वासू लोकांकडून विश्वासघात झाल्याचा अनुभव मनाला वेदनादायी ठरेल. आर्थिक व्यवहार करताना खूप विचारपूर्वक करावेत. शक्यतो उधार किंवा उसने न देणे हिताचे राहील.

कुंभ : आपल्या पेक्षा वरिष्ठ किंवा सन्मानीय व्यक्तिमत्वाकडून बोध घेण्यासारख्या गोष्टी अनुभवायला मिळतील. त्यातूनच जीवनाच्या पुढील दिशा ठरविण्यास मदत होईल. आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्ये पार पाडण्यासाठी आत्मबल वाढेल. न्यायिक विषयात यश संपादन कराल.

मीन : आजचा दिवस कौटुंबिक जिव्हाळा वाढवणारा आहे. घरच्या मंडळींसोबत वेळ व्यतीत कराल. प्रचलित व्यवसाय उद्योगात नवीन झेप घेण्यासाठी सकारात्मक वातावरण तयार होईल. घर खरेदी किंवा जमिनीचे व्यवहार विषयक चर्चा पुढे जाईल. पुढील दोन दिवस आर्थिक व्यवहार टाळावेत.

Latest Posts

Don't Miss