Monday, May 20, 2024

Latest Posts

राशी भविष्य १२ जानेवारी २०२३, कामकाजात आज तुमची…

कर्ज मागणी केली असल्यास त्याकामी आपणास सकारात्मक प्रतिसाद मिळेल. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या चोरी होण्याची शक्यता आहे.

ज्यो. श्री रविंद्र भगवान पाठक, गुरुजी , ठाणे.

मेष : कर्ज मागणी केली असल्यास त्याकामी आपणास सकारात्मक प्रतिसाद मिळेल. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या चोरी होण्याची शक्यता आहे. व्यसनाधीनता वाढणार नाही याबाबत काळजी घ्या. तुमच्या मुखातून अनावधानाने निघालेल्या शब्दाचा विपर्यास केला जाऊ शकतो. म्हणून बोलण्याआधीच भविष्यातील दूरगामी सादपडसादाची काळजी घ्या.
स्त्रीयांसाठी : तुमचा शब्द पाळला जाईल.

वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात उत्तम प्रगती दिसून येईल. संतान प्राप्तीसाठी जी मंडळी प्रयत्न करीत आहेत त्यांना समस्येवर समाधान प्राप्त होईल. कमी अंतराचे प्रवास घडून येतील. संगीत क्षेत्रातील मंडळींसाठी आजचा दिवस अत्यन्त आनंददायी ठरेल. आयुष्याचे मर्म समजून घ्या. प्रभावी लेख लिहीणे , अनमोल सल्ला देणे यासारख्या गोष्टी आज प्रभावीपणे घडण्याची शक्यता आहे. ईश्वरीय चिन्तनाने मनाला समाधान प्राप्त होईल.
स्त्रीयांसाठी : नाविन्यपूर्ण विषयात रस निर्माण होईल.

मिथुन : जीवनातील मैलाचा दगड ठरवा अशाप्रकारच्या संस्मरणीय घटना आहे घडू शकतील. अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. जागा अथवा घर खरेदीसाठी आजचा दिवस धोरणात्मक निर्णय घेण्याचा आहे. आपल्या संवेदनशील वागण्याने आयुष्याला अर्थ प्राप्त होतो हे ध्यानात ठेवा. ठोस निर्णय झाल्याने आत्मिक समाधान लाभेल. आर्थिक व्यवहारात देणेंकरी वसुलीसाठी तगादा लावू शकतात. नवीन कर्ज घेण्यासाठी आजचा दिवस नुकसान वाढविणारा ठरू शकतो.
स्त्रीयांसाठी : नित्य नियमात फेरबदल करावा लागेल.

कर्क : विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण व्हाल. कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणा-यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होईल. घरामधील वातावरण मंगलमय बनून राहील. नवीन विषयाचा अभ्यास सुरु करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. तुमच्या व्यावसायिक स्थितीत देखील भरभराट होईल. ठोस निर्णय घेत असतानाही स्वभावातला भावनिक ओलावा कायम टिकून राहील.
स्त्रीयांसाठी : कामानिमित्ताने प्रवास करावा लागेल.

सिंह :कुटुंबातील संवादात न्याय्य भूमिका मांडाल . तुमच्या संवाद शैलीने सर्वांची मन जिंकाल . समाजात लौकिक प्रतिष्ठा वाढेल. भावन्डाकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याबाबत विचार करीत असाल तर आज तो निर्णय पक्का होईल. आज उत्तम लक्ष्मी लाभ होईल. धाडसाने उचलेली पावले आणि घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. जे लोक घरापासून दूर राहतात ते विरंगुळा म्हणून आज सहलीला जाऊ शकतात.
स्त्रीयांसाठी : परिवारात मंगलमय घटना घडतील.

कन्या : व्यावहारिक ध्येय धोरणात आमूलाग्र बदल करून फायद्याचा लेखाजोखा मांडण्यात यशस्वी व्हाल. आजचा ठरवलेला बदल अमलात आण्याचा प्रयत्न करा. पारिवारिक स्नेहसंबंध सुधारण्यासाठी केलेला प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी होईल. सात्विक अष्टभाव जागृत होतील. तुमची विनोदबुद्धी जागृत ठेवा. बौद्धिक क्षमता वाढेल. निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा योग संभवतो.
स्त्रीयांसाठी : काही नवीन संकल्पना सुचतील.

तुला : लॉटरी सारख्या व्यवहारात केलेली गुंतवणुक नुकसानकारक ठरू शकते. शिक्षणासाठी ही वेळ अधिक उत्तम आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. अचानक वाढलेल्या खर्चामुळे आर्थिक गणित बिघडु शकतात. कोणतीही वेळ इतर साधनांपेक्षा अत्यन्त बलवान असते याची प्रचिती येईल. जे व्यवहार पूर्णत्वास नेण्यास आपण चिंतीत आहात असे व्यवहार आहे त्यास्थितीत असू द्या.
स्त्रीयांसाठी : अवास्तवाच्या मागे धावू नका .

वृश्चिक : आज अचानक मनाला दिलासा देणारी घटना घडू शकेल. त्यामुळे तुम्ही सुख आणि आनंदाचा उपभोग घेऊ शकाल. तुमच्याशी सलगी करणारे लोक समाधानी होतील. परदेश गमनासाठी करीत असलेल्या प्रयत्नास यश मिळेल. मात्र त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य अशा मार्गावर घेऊन जातील. तुम्हाला कार्यक्षेत्रात चांगले फळ मिळण्यासाठी आपल्या काम करण्याच्या पद्धतीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे .
स्त्रीयांसाठी : कामाचा ताण वाढल्याने त्रस्त व्हाल.

धनु : घरगुती वस्तुंची निष्काळजी पणे हाताळणी करणे तुम्हाला अडचणीत टाकू शकते. खाजगी कार्यक्रमांना जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे . त्यामुळे प्रभावी, वरीष्ठ व्यक्तींशी निकटचा संपर्क निर्माण होऊ शकेल. वडीलधाऱ्या व्यक्तींकडून अनमोल मार्गदर्शनाचा लाभ होईल. त्यांचे बोल आपले जीवन परिवर्तित होणारे असतील. आपल्या संततीकडून सन्मान वाढेल अशा कृती घडून येतील.
स्त्रीयांसाठी : अधिकारीक भूमिका निभावी लागेल.

मकर : वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. दैवी कृपेची अनुभूती येऊन धार्मिक आस्था वाढेल. कामासंबंधित विषयात आपले मत विचारल्यानंतर मांडताना स्पष्टवक्तेपणा ठेवा. आपल्या मताचे खूप कौतुक होऊ शकते. दूरच्या देशातून दिलासादायक बातमी येईल. व्यावसायिक योजना मूर्तरूप घेण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण होईल. नवीन विषयाच्या अभ्यासासाठी अनुकूल वातावरणाची निर्माण होईल.
स्त्रीयांसाठी : आपल्याला दैवी कृपेचा लाभ होईल.

कुंभ : आपल्या कामाबाबत आणि दृष्टीकोनाबाबत प्रामाणिक राहा. तुम्ही तुमच्या दृढ निश्चयी स्वभावामुळे तुमच्या कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. खाण्यापिण्याच्या सवयीला मनाच्या ताब्यात ठेवणे अत्यावश्यक आहे. आपण हाती घेतलेल्या कामास हटवा वरिष्ठांनी नेमून दिलेल्या जबाबदारीस संपूर्ण समर्पण भावाने न्याय देण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक स्थिती चांगल्या प्रमाणात सुधारेल, मात्र त्याचवेळी खर्चाचे प्रमाण देखील वाढलेले असेल.
स्त्रीयांसाठी : मानसिक संतुलन ढासळू शकते.

मीन : जिवलग सखा भेटेल. जुन्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आजचा दिवस मन प्रसन्न करणारा राहील. तुमची प्रिय व्यक्ती आज तुमच्याकडे काही वेळ मागण्याची तसेच भेटवस्तूही मागण्याची शक्यता आहे. भागीदारीमध्ये सुसंवादाने मार्ग सापडतील. कामकाजात आज तुमची एका महत्वाच्या महान व्यक्तीशी ओळख होईल. प्रवास करावा लागणार असेल तर सर्व महत्त्वाची कागदपत्रे बरोबर ठेवा.
स्त्रीयांसाठी : कौटुंबिक जीवनात आनंदी रहाल.

हे ही वाचा:

National Youth Day 2023 राष्ट्रीय युवा दिन का साजरा केला जातो, जाणून घ्या त्यामागचे कारण आणि इतिहास

Makar Sankranti 2023 मकर संक्रांतीच्या दिवशी अशा सोप्या पद्धतीने घरच्या घरीच बनवा स्वादिष्ट खिचडी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss