Monday, May 20, 2024

Latest Posts

राशी भविष्य, १३ जानेवारी २०२३, “या” राशीच्या लोकांच्या परिचित लोकांमुळे…

आज तुम्ही मैदानी खेळात बाजी मारू शकला. गट कळलंत केलेली गुंतवणूकीचा आज तुम्हाला फायदा मिळू शकतो. कौटुंबिक प्रश्न चव्हाट्यावर येऊ नयेत यासाठी काळजी घ्या. अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता अधिक आहे.

ज्यो. श्री रविंद्र भगवान पाठक गुरुजी , ठाणे.

मेष : आज तुम्ही मैदानी खेळात बाजी मारू शकला. गट कळलंत केलेली गुंतवणूकीचा आज तुम्हाला फायदा मिळू शकतो. कौटुंबिक प्रश्न चव्हाट्यावर येऊ नयेत यासाठी काळजी घ्या. अन्यथा तुमची बदनामी होण्याची शक्यता अधिक आहे. प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल.
स्त्रीयांसाठी : दगदग जाणवेल.

वृषभ : तुम्ही करीत असलेल्या प्रयत्नाला आज मूर्त स्वरूप मिळण्याची शक्यता आहे. स्वप्नाच्या पूर्तीसाठी त्याचा केलेला पाठलाग तुम्हाला यशाच्या शिखराकडे जाण्यास मदत करील. आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील.
विद्यार्थ्यांसाठी : कर्तव्यनिष्ठतेवर भर राहील.

मिथुन : अतिउत्साहीपणाने किंवा भावनिक होऊन कोणतेही निर्णय घेऊ नका. आपल्या परिचित लोकांमुळे उत्पन्नाचा नवा स्रोत सुरू होईल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. अतिस्पष्टवक्तेपणा आणि भावनांना व्यावसायिक बैठकांमध्ये आवर घाला. आपण केलेल्या स्वयंसेवी कामाचा उपयोग केवळ ज्यांना मदत केली त्यांनाच न होता स्वत:कडे सकारात्मकपणे पाहण्यास होईल.
स्त्रीयांसाठी : जनजागृती करण्यात रस निर्माण होईल.

कर्क :आज गर्भवती महिलांसाठी विशेष काळजीचा दिवस आहे . कोणत्याही परिस्थितीत तज्ज्ञांचा सल्ला मानणे फायदेमंद राहील. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात अनुकूल परिस्थितीचा अनुभव घ्याल – त्यातूनच तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. तुमच्या प्रतिष्ठेमध्ये आणखी मानाचा तुरा खोवला गेल्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे नीतीधैर्य उंचावेल. सत्य प्रेम आनंद या त्रिसूत्रीचा अनुभव घ्याल.
स्त्रीयांसाठी : पोटाचे विकार विचलित करू शकतात.

सिंह : बचत करण्याचा विचारात आपण अधिक नुकसान वाढवून घेऊ शकतात. तुमच्या ज्ञानलालसेपोटी नवीन मित्र जोडाल. नातेसंबंधात दुरावा वधुण्याची शक्यता आहे. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याचा तुम्ही सक्षमपणे मुकाबला कराल. तात्काळ गरजेच्या गोष्टींच्या खरेदीत आजचा वेळ वाया जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्त्रीयांसाठी : पारिवारिक स्नेह वाढेल.

कन्या : कामाच्या धावपळीत आजचा दिवस अत्यंत व्यस्त राहील. जमीन, स्थावर जंगम मालमत्ता, किंवा सांस्कृतिक प्रकल्प यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रीत करा. भावनिक अडथळे अडचणी निर्माण होऊ शकतात. दिवसाची सुरवात जरी थोडी दगदगीची राहील परंतु, जसजसा दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळेल.
स्त्रीयांसाठी : मानसिक आनंद मिळेल.

तुला : तुमच्या विचारांवर ज्यांची छाप आहे अशा विशेष व्यक्तीची भेट होऊ शकते. तुमच्या योजना बारगळविण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करतील – म्हणून तुमच्या अवतीभवतीच्या लोकांबाबत खातरजमा केल्याशिवाय समाजात व्यक्त होऊ नका. फावल्या वेळेचा योग्य वापर करणे तुम्हाला शिकावे लागेल. आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल.
स्त्रीयांसाठी : वाणीवर नियंत्रण ठेवावे.

वृश्चिक : हृदयरोग असणाºयांनी काळजी घेण्याची गरज आहे. मंडळींनी कर्ज घेतले होते त्यांना त्याची परत फेड करताना समस्यांचा सामना करावा लागू शकतो. मुलांकडून एखादी समाधानकारक बातमी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या भागीदारीच्या कामामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता. कितीही मनस्ताप झाला तरी आपण आपल्या विचारांपासून तसूभर हटणार नाहीत.
स्त्रीयांसाठी : घरातील मानाने अथवा वयाने मोठया व्यक्तींकडून उत्तम सहकार्य लाभेल.

धनु : रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून काम करीत असाल किंवा शिक्षण घेतात तर, तोतया लोकांपासून दूर राहणे शिका. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे. तुमच्या वर्चस्वशाली दृष्टिकोनामुळे सहकाऱ्यांकडून टीका होईल. या राशीतील लोकांना आजच्या दिवशी स्वतः साठी वेळ काढण्याची अधिक आवश्यकता आहे.
स्त्रीयांसाठी : तुमच्या मतावर तुम्ही ठाम रहाल.

मकर : तुमच्या व्यवहाराला आज उत्तम गती प्राप्त होईल. तुमच्या कष्टाचे पैसे गुंतवताना नीट विचार करा. कौटुंबिक जबाबदा-या बंधनांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा महागात पडू शकतो. तुमच्या प्रेमजीवनात आजच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी खास मिळणार आहे. राजकीय क्षेत्रात उच्च पदप्राप्तीचे योग संभवतात. तुमच्यावर विसम्बुन असणाऱ्या मंडळींची विशेष काळजी घ्या.
स्त्रीयांसाठी : कामकाजात सहजता आणि सुलभता निर्माण होईल.

कुंभ : आजचा दिवशी घडणारा प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. वेळ आणि पैसा याचे महत्व जाणून वापर करावं. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आज सकारात्मक बदल झालेला दिसून येईल. क्रिडा क्षेत्रात आपला लॊकिक वहदू शकेल. कौटुंबिक स्नेह जपण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या कर्तव्यापासून दूर जाता येणार नाही.
स्त्रीयांसाठी : शब्दांच्या जाळ्यात फसण्याची शक्यता आहे.

मीन :आजचा दिवस भक्तिमय वातावरणात जाईल. आपण करीत असलेल्या मेहनतीला न्याय मिळेल. आजचा दिवस सर्वसाधारणपणे लाभदायक आहे, विश्वासू लोकांवर अवलंबून राहून कोणताही निर्णय घेऊ नका. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. स्नेह संमेलन किंवा पारंपरिक सण व्रत यासारख्या कार्यक्रमात सहभागी व्हाल.
स्त्रीयांसाठी : कौंटुंबिक संतुलन राखू शकाल.

हे ही वाचा:

मुस्लिमांच्या मतदानाचे काढून घ्या, “या” नेत्याने केली खबळजनक मागणी,

मुंग्यांच्या चटणीपेक्षा विचित्र पदार्थ खाल्ले जातात भारताच्या ‘या’ भागात, नावं वाचून व्हाल आश्चर्यचकित

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss