आजचे राशिभविष्य, ४ जून २०२३, आजच्या दिवशी मनस्थिती…

आजच्या दिवशी कामाचा अतिरिक्त तणाव जाणवेल. कामाच्या ठिकाणी काही अप्रिय, मनाविरुद्ध घटना घडू शकतात.

आजचे राशिभविष्य, ४ जून २०२३, आजच्या दिवशी मनस्थिती…

माझी रास

मेष
आजच्या दिवशी कामाचा अतिरिक्त तणाव जाणवेल. कामाच्या ठिकाणी काही अप्रिय, मनाविरुद्ध घटना घडू शकतात. वरिष्ठांशी, सहकाऱ्यांशी मतभेद होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

वृषभ
आज कुटुंबियांसमवेत काही प्रवासाचे योग संभवतात. मात्र प्रवासात काळजी घ्यावी. वाहने जपून चालवावी. आजचा दिवस आनंदात व्यतीत कराल.

मिथुन
आजच्या दिवशी मनस्थिती काहीशी चांगली राहणार नाही. त्याचा परिणाम प्रकृतीवर देखील जाणवेल. अचानक काही समस्या, संकटे यांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे सावधानता बाळगावी.

कर्क
आजच्या दिवशी सर्वांना आपल्या सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल. आपले सहकारी, भागीदार यांच्याबरोबर काही नवीन कामांची आखणी कराल. मात्र कोणत्याही प्रकारे वाद होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

सिंह
आजच्या दिवशी शारीरिक, मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. आजचा दिवस असमाधानकारक राहील. आरोग्याच्या छोट्या-मोठ्या कुरबुरी सतावतील. शांत चित्त व संयम आज आवश्यक राहील.

कन्या
आजच्या दिवशी उत्तम संततीसौख्याची प्राप्ती कराल. मुलांसमवेत वेळ आनंदात, मजेत जाईल. क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्तम असेल. काही नवीन संधी निर्माण होतील.

तुळ
आज उत्तम गृहसौख्य, वास्तू वाहन सौख्य लाभेल. आज काही निर्णय भावनावश होऊन घ्याल. घरातील सदस्यांचे उत्तम सहकार्य व प्रेम आज लाभेल. आपणही अधिक काळ घरातच रममाण व्हाल.

वृश्चिक
आजच्या दिवशी आपल्या दबंग स्वभावाला अनुसरून एखादे धाडस कराल. काही महत्त्वपूर्ण निर्णय घ्याल. कामानिमित्त काही छोटे-मोठे प्रवास देखील संभवतात.

धनु
आज आपल्या कुटुंबियांसमवेत अमूल्य वेळ घालून सुखाची अनुभूती घ्याल. कुटुंबीयांसमवेत बाहेर जाण्याचे बेत आखाल. त्यामुळे काही अतिरिक्त खर्च देखील होतील.

मकर
आजच्या दिवशी आपला उत्साह दांडगा असेल. बऱ्याच नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता असेल. त्यासाठी धाडस करण्याची देखील तयारी राहीलं. मात्र रागावर थोडे नियंत्रण आवश्यक राहील.

कुंभ
आजचा दिवस तणावग्रस्त, चिंताग्रस्त जाईल. मनाप्रमाणे एकही गोष्ट न घडल्याने चिडचिड होईल. कोर्टकचेरी संदर्भातील कामे टाळावीत. खर्च सांभाळून करावेत.

मीन
आज सर्वत्र आपली सकारात्मक छाप सोडाल. प्रसिद्धी, प्रशंसा, नावलौकिक प्राप्त कराल. नोकरी-व्यवसायातुनही चांगले अर्थार्जन संभवते. आजच्या दिवसाचा आनंद घ्या.

माऊली ज्योतिष कार्यालय
पं केतन पाठक गुरुजी
९८९२४१३८६०

Exit mobile version