Wednesday, May 22, 2024

Latest Posts

“मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा”; ऐतिहासिक दिवस का साजरा केला जातो ?

मराठी भाषिकांच्या आक्रमक आंदोलनामुळे अखेर मुंबई महाराष्ट्राला मिळाली. या संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात येत मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली.

कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्राचा आज वाढदिवस..या महाराष्ट्राने हिंदु, मुस्लिम,सीख, ख्रिश्चन अशा सर्वभाषिकांना आपल्यात सामावून घेतले आहे.  मे महिन्यातील १ तारीख हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात “महाराष्ट्र दिन” आणि “कामगार दिवस”म्हणुन साजरा करतात. तमाम जनतेसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र दिवस त्याच बरोबर आज गुजरात दिवस देखील साजरा केला जातो. महाराष्ट्र ही भूमी महानथोर नेत्यांची भूमी म्हणून ओळखली जाते. पण आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशी झाली हे तुम्हाला माहित आहे का ? चला तर आपण जाणून घेऊयात.

छत्रपती शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत, महात्मा फुलेंपासून, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत तर संत ज्ञानेश्वर महारांजापासून तुकोबांपर्यंत अशा अनेक थोर मंडळींचा जन्म झाला. स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर काही काळ गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन्ही राज्य मुंबई प्रांताचे भाग होते. त्यावेळी मुंबई प्रांतात मराठी आणि गुजराती भाषकांची संख्या अधिक होती. दोन्ही भाषिकांकडून स्वतंत्र राज्याची मागणी केली जात होती,त्यामुळे भाषावार प्रांतरचनेमुळे गुजरात आणि महाराष्ट्र या दोन वेगळ्या राज्याची घोषणा करण्यात आली.

फ्लोरा फाऊंटन येथे संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्याद्वारे गोळीबार करण्याचा आदेश देण्यात आला होता. ज्या भागात मराठी बोलणारे अधिक तो भाग त्या राज्याला दिला पाहिजे हे ठरलं होतं. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, असा मराठी भाषिकांची आग्रह होता. मराठी भाषिकांच्या आक्रमक आंदोलनामुळे अखेर मुंबई महाराष्ट्राला मिळाली. या संयुक्त महाराष्ट्रासाठी १०५ हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात येत मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली.

तर दुसरीकडे भारतातल्या लेबर किसान पार्टी ऑफ हिंदुस्तानच्या (Labour Kisan Party Of Hindhustan) च्या वतीने १ मे १९२३ रोजी कामगारांचे प्रतीक असलेला लाल झेंडा फडकवत हा दिवस साजरा करण्यात आला. १९८९ मध्ये पहिल्यांदा कामगार दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा दिवस साजरा करण्याची योजना अमेरिकेत सुरू झाली, जेव्हा कामगार एक म्हणून रस्त्यावर आले तेव्हापासून महाराष्ट्र सरकार आणि संपूर्ण जनता हा दिवस ” महाराष्ट्र दिवस ” म्हणून साजरा करतात. कामगारांच्या कामाचे प्रतीक म्हणुन हा दिवस “कामगार दिवस” म्हणून साजरा करतात.

महापुरुषांमुळे आणि १०५ हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आज महाराष्ट्र आपल्य़ाला मिळाला त्यामुळे संपूर्ण जनतेचं ऊर भरुन येतो आणि अवघा महाराष्ट्र अभिमानाने म्हणतो “जय जय महाराष्ट्र माझा,गरजा महाराष्ट्र माझा”.

हे ही वाचा:

अखेर ठरलं! उत्तर पश्चिममधून वायकरांना उमेदवारी जाहीर ‘यांचं’ स्वतःच कर्तृत्व काहीच नाही,

Girish Mahajan यांची MVA वर जोरदार टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss