Monday, May 20, 2024

Latest Posts

केसांच्या समस्या दुर करायच्या असतील तर तुरटी ठरु शकते फायदेशीर,जाणुन घ्या फायदे

रोजच्या दैनंदिन जीवनातील धावपळीत आपण आपल्या अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो.

रोजच्या दैनंदिन जीवनातील धावपळीत आपण आपल्या अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतो.दरम्यान आजकाल केसांच्या समस्या फार वाढल्या आहेत.त्यामुळे केसांच्या समस्यांना अनेक लोक ही हैराण झालेले असतात. केस गळणे, केसांना फाटे फुटणे, केस पांढरे होणे, केस फ्रिझी होणे, इत्यादी केसांच्या समस्यांमुळे उद्भवतात,दरम्यायान मग  समस्या दूर करण्यासाठी, अनेक उपाय देखील केले जातात. यासाठी अनेक महिला बाजारात मिळणाऱ्या महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर करतात. मात्र, यामुळे तात्पुरता फरक पडतो.तर काहीनां यांचा काहीच उपयोग देखील होत नाही.मात्र आपण घरच्या घरी उपाय करणं विसरतो किंवा त्याची आपल्याला माहिती नसते.परंतु, केसांच्या  या समस्या दूर करण्यासाठी आणि लांब आणि घनदाट केसांसाठी  तुम्ही तुरटीची मदत घेऊ शकता. दुकानात होलसेल दरात मिळणारी तुरटी आपल्या आरोग्यासोबतच केसांसाठी देखील अतिशय फायदेशीर आहे. तुरटीचा वापर केल्याने केसांच्या समस्या दूर होण्यास मदत होते.जाणुन घेऊयात तुरटीचे फायदे

केसगळती होईल कमी

तुरटीमध्ये पोटॅशिअम आणि सोडिअमचे भरपूर प्रमाण आढळून येते. हे दोन्ही घटक आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहेत. जर तुमचे केस गळत असतील आणि केसांची वाढ खुंटली असेल तर तुम्ही तुरटीचा वापर करू शकता. यामुळे, केसांची वाढ होण्यास मदत होईल.

यासाठी तुम्ही तुरटीची बारीक पावडर करा. त्यानंतर, खोबरेल तेलात ही पावडर मिसळा, आणि केसांना लावा. हा उपाय आठवड्यातून किमान २ वेळा करा. यामुळे, केसांची वाढ होण्यास मदत होईल आणि केसगळतीला आळा बसेल.

पांढऱ्या केसांसाठी फायदेशीर

आजकाल अकाली केस पांढरे होण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही तुरटीसोबत कलौंजीच्या तेलाची मदत घेऊ शकता. कलौंजीचे तेल केसांच्या समस्या दूर करण्यासाठी अतिशय लाभदायी आहे.

हा उपाय करण्यासाठी तुम्ही तुरटीची बारीक पावडर करा आणि ही पावडर कलौंजीच्या तेलात मिसळा. आता हे मिश्रण टाळूला लावा. यामुळे, केस पांढरे होण्याची समस्या दूर होण्यास मदत होईल. अधिक चांगल्या परिणामांसाठी हा उपाय नियमितपणे आठवड्यातून २ वेळा करा.

कोंड्याची समस्या होईल दूर

हिवाळ्यात अनेकांना कोंड्याची समस्या भेडसावते. पुरूष आणि महिला दोघांच्या ही केसांमध्ये कोंड्याची समस्या या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळते. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही तुरटीची मदत घेऊ शकता. कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी तुरटी अतिशय गुणकारी आहे.

यासाठी तुम्ही तुरटीची बारीक पावडर करा. ही पावडर पाण्यात मिसळा. त्यानंतर, त्यात थोडा लिंबाचा रस मिसळा. आता हे मिश्रण केसांमध्ये लावा. ३० ते ३५ मिनिटांनी केस धुवून टाका. यामुळे, कोंड्याची समस्या दूर होण्यास मदत होईल.

 

हे ही वाचा: 

राजकारणात एन्ट्री करण्याबाबत कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे हा बेअक्कल माणूस आहे; नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss