spot_img
Thursday, February 22, 2024
spot_img

Latest Posts

दिवसभराच्या धावपळीने पाठ दुखतेय? हे २ उपाय करा आणि ५ मिनिटांत दुखणं थांबवा…

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाचेच आरोग्यावर दुर्लक्ष होत आहे. त्यात पाठदुखी ही मोठी समस्या अगदी लहानग्यापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उध्दभवते.

आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाचेच आरोग्यावर दुर्लक्ष होत आहे. त्यात पाठदुखी ही मोठी समस्या अगदी लहानग्यापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच उध्दभवते. बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे पाठदुखीची समस्या आजकाल १० पैकी ८ लोकांमध्ये पाहायला मिळते. महिला असो की पुरुष, आजकाल पाठदुखी ही एक सामान्य समस्या बनली आहे. हा आजार तरुणाईलाही आपल्या कवेत घेत आहे. पाठदुखीची अनेक कारणे आहेत, पण त्याची मुख्य कारणे म्हणजे एकाच आसनात जास्त वेळ काम करणे किंवा शरीरात कॅल्शियम आणि जीवनसत्त्वांची कमतरता.त्यामुळे पाठीचे दुखणं कमी करण्या साठी दिलेले २ सोप्पे उपाय त्वरित सुरु करावे.

जर तुम्हाला पाठदुखी असेल तर जास्त वेळ एकाच स्थितीत बसू नका हळूहळू ही पाठदुखी इतकी वाढते की आपल्याला काहीच सुधरत नाही आणि डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येते. त्यामुळे कामाच्या दरम्यान खुर्ची योग करा. यामुळे शरीरात ताण निर्माण होईल. त्याच वेळी संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण होते. याशिवाय पाठदुखीच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपण असे २ घरगुती उपाय जाणून घेऊयात ,ज्याच्या मदतीने तुम्हाला आराम मिळू शकतो.

पाठदुखी पासून मुक्त होण्यासाठी पुढील उपाय करा –

दोन्ही पायात अंतर घेऊन उभे राहा. कंबरेतून खाली वाकून एक हात जमिनीला टेकवा आणि दुसरा हात सरळ रेषेत वर घ्या. वर घेतलेल्या हाताकडे पाहायचा प्रयत्न करा. असे दोन्ही बाजुने करा. म्हणजे कंबरेला आणि मणक्याला चांगला व्यायाम होईल.

गुडघे आणि हाताचे तळवे जमिनीटवर टेकवून प्राण्यांसारखे बसा. पुन्हा एक हात टेकवून दुसरा हात वर करा आणि वरच्या हाताकडे पाहायचा प्रयत्न करा. यामुळे मानेपासून कंबरेच्या खालच्या भागापर्यंत सगळ्या भागाला अतिशय चांगला व्यायाम होतो. बसून बसून अवघडले असेल तर स्नायू मोकळे होण्यासही या व्यायामाची चांगली मदत होते.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss