Friday, April 19, 2024

Latest Posts

Sunglasses विकत घेताना ‘ही’ काळजी नक्की घ्या, नाही तर होऊ शकतो आरोग्यावर मोठा परिणाम!

वाढत्या उष्णतेमुळे शरीराची योग्य प्रकारे काळजी घेणे हे गरजेचे आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे आपल्या शरीरामध्ये अनेक आरोग्यासंदर्भात समस्या उद्भवू शकतात.

वाढत्या उष्णतेमुळे शरीराची योग्य प्रकारे काळजी घेणे हे गरजेचे आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे आपल्या शरीरामध्ये अनेक आरोग्यासंदर्भात समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यांत घराबाहेर पडताना स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. घरातून बाहेर पडताना आवर्जून पाण्याची बाटली, रुमाल, छत्री, सनग्लासेस या सगळ्या गोष्टी आठवणीने घ्या जेणे करून अतिउष्णते पासून आपण सुरक्षित राहू शकतो. उन्हापासून डोळ्यांचे रक्षण करणे हे देखील अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी आपण सनग्लासेस किंवा गॉगल वापरतो, परंतु हेच विकत घेताना दक्षता घेणे गरजेचे आहे कारण फेक सनग्लासेसमुळे आरोग्यावर दुषपरिणाम होतो. आणि जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

उन्हापाससून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने सनग्लासेस वापरलेच पाहिजे. सनग्लासेस हे प्रामुख्याने उन्हापासून डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी वापरले जातात. परंतु आपण कधी कधी स्टायलिंगचा किंवा फॅशनचा विचार करुन सनग्लासेसची खरेदी करतो. काही ठिकाणी स्टायलिश पण फेक सनग्लासेस हे स्वस्त दरात मिळतात आणि ते आपण आवर्जून घेतो पण याचाच वाईट परिणाम आपल्या डोळ्यांवर नकळत होतो.अश्यावेळी सनग्लासेस विकत घेताना नेमकी कोणती काळजी घेतली पाहिजे हे आपण पाहुयात

सनग्लासेसचा शेप –

बऱ्याचदा आपण फक्त स्टायलिश फ्रेम ला आकर्षित होऊन ती विकत घेतो आणि ती आपल्या चेहऱ्याला शोभत ही नसते. तसेच आपले डोळे ही पूर्णपणे झाकले जात नाहीत. त्यामुळे सनग्लासेस विकत घेताना नेहमी आपल्या चेहऱ्याला शोभेल असाच घ्यावा, जेणेकरून आपले डोळे पूर्णपणे झाकले जातील.

सनग्लासेसचे लेंन्स –

सनग्लासेसचे लेंन्स जितके पातळ असतील तितके ते आपल्यासाठी चांगले असतात. पातळ सनग्लासेसचे लेंन्स सूर्यप्रकाश लगेच परावर्तित करुन, प्रखर उन्हापासून डोळ्यांचे रक्षण करतात. जड किंवा जास्त हेव्ही फ्रेम्स व लेंन्स असलेल्या सनग्लासेसची निवड केल्यास ते परिधान केल्यानंतर आपल्याला डोळ्यांजवळील भागात जास्त घाम येऊ शकतो. यासासाठीच सनग्लासेसचे लेंन्स व फ्रेम्स या जास्त जड नसून हलक्या व पातळ असाव्यात.

डॉक्टरांचा सल्ला –

सनग्लासेस विकत घेताना अशा सनग्लासेसची खरेदी करावी की जे, ९९% ते १००% यूवीए आणि यूवीबी किरणांना प्रतिबंधित करतील. सनग्लासेस खरेदी करताना डॉक्टरांचा सल्ला आवर्जून घ्यावा, जेणे करून जर आपल्याला चष्मा असल्यास आपल्याला योग्य असणाऱ्या सनग्लासेसची खरेदी करणे उपयुक्त ठरते.

सनग्लासेसची वॉरंटी –

आपल्याला आवडलेले सनग्लासेस विकत घेण्यापूर्वी ते एकदा प्रत्यक्षात आपल्या डोळ्यांवर घालून पाहावेत. आणि सनग्लासेस विकत घेण्या अगोदर एकदा सनग्लासेस वॉ रेंटी तपासून घ्यावी.

हे ही वाचा : 

गौरी खानचं नवीन पुस्तक आलं वाचकांच्या भेटीस …. नवरा शाहरुख खानने केलं लाँच

प्रशांत दामले अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान

Khupte Tithe Gupte च्या पहिल्या भागात कोण येणार पाहिलं? EKNATH SHINDE की RAJ THACKERAY?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

Latest Posts

Don't Miss