Friday, May 17, 2024

Latest Posts

तजेलदार त्वचेसाठी घरच्या घरी ‘हे’ उपाय नक्की करुन पहा

जर तुम्हाला कायमस्वरुपी त्वचा चांगली व तजेलदार व्हावी असे वाटत असेल तर चला, त्वचा सुधारण्यासाठीच्या या टिप्स जाणून घेऊया.

त्वचा चमकदार आणि चांगली दिसावी असं तुम्हाला वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घेणं ही तितकंच महत्वाचं आहे. दरवेळी बाजारातून महागडे प्रॉडक्ट्स आणून ते वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते. मात्र, जर तुम्हाला कायमस्वरुपी त्वचा चांगली व तजेलदार व्हावी असे वाटत असेल तर चला, त्वचा सुधारण्यासाठीच्या या टिप्स जाणून घेऊया. महत्वाचे म्हणजे या टीप्स तुम्ही घरच्या घरी सुद्धा वापरून पाहू शकता.
१. जर तुमच्या चेहऱ्यावरील त्वचा कोरडी पडत असेल तर त्यावर उपाय म्हणून ताज्या दुधावरची मलई चेहऱ्यावर लावावी. त्यानंतर हलक्या हातांनी चेहऱ्याला मालिश करावे.
२. मुलतानी माती पाण्यात भिजवून काही वेळ ठेवा. त्याचं मिश्रण चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा तजेलदार देखील होते. जर तुमची त्वचा तेलकट असेल तर याचा जास्त फायदा तुम्हाला होईल.
३. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी बदामाच्या तेलाचा फायदा होतो. या तेलाची मालिश केल्यास चेहऱ्याचं सौंदर्य अधिक खुलायला लागतं.
४. बेसन पीठ आणि चंदन पीठ एकत्रीत करुन त्यांचे मिश्रण तयार करा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्याच्या त्वचेवरील अस्वच्छता साफ होऊन चेहरा तजेलदार दिसू लागेल.
५. तांदळाचे पीठ आणि त्यात दुध यांचे मिश्रण करून चेहऱ्यावर रोज 10 मिनिटे लावल्यास चेहरा उजळण्यासाठी मदत होते. तसेच तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावल्यास सुरकुत्या आणि चेहऱ्यावरचे डाग कमी होतात.
त्वचेवरील अधिक समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला वरील टिप्स चा नक्की फायदा होईल. वरील सामग्री व उपाय तुम्ही घरच्या घरी सुद्धा करून पाहू शकता.

Latest Posts

Don't Miss