Tuesday, May 21, 2024

Latest Posts

वजन कमी करायचंय? तर ‘ही’ सोपी आयडिया वापरा

आजकाल वाढत्या जीवनशैलीमुळे अवेळी खाणे, फास्ट फूड खाणे यामुळे वजन वाढीच्या समस्या जाणवतात. वजन  कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे औषध बाजारात उपलब्ध असतात. जिम आणि डायट केल्याने पण वजन कमी होते. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर ही वजन कमी होत नसेल तर मग घरच्या घरी एक उपाय करून पहा. नैसर्गिक पद्धतीने वजन कमी केल्यावर कोणतेही हानीकारक परिणाम शरीरावर होणार नाहीत.

उकळत्या पाण्यामध्ये जर लिंबू आणि मध टाकून पिल्यानंतर वचन कमी होण्यास मदत होते. लिंबूमध्ये आमिनो ऍसिड असते. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. ज्यामुळे रोगांचा धोका कमी होतो. हे लिंबू मधाचे पाणी सकाळी उठल्यानंतर पिल्यावर लवकर वजन कमी होण्यास मदत होते. पाण्यामध्ये मध टाकल्यास पचनशक्ती वाढवते. ज्यामुळे कॅलरीज पटकन बर्न होऊ पोट साफ आणि सपाट होते. कोमट पाण्यामध्ये लिंबू आणि मध टाकून पिल्यानंतर शरीरामध्ये ऊर्जा वाढते. यामुळे दिवसभरात थकवा आणि आळस येत नाही. शरीरातील फॅट बर्न करायचे असतील तर जिऱ्याचे पाणी पण पिऊ शकता. एका भांड्यात पाणी गरम करत ठेवा त्यामध्ये थोडे जिरे टाका. जिरे पाणी छान उकळल्यानंतर ते पाणी चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या. त्यामध्ये तुम्ही मध आणि दालचिनीची पावडर घालून पाणी  पिऊ शकता. या पाण्याचे नियमित सेवन केल्यास चरबी घटते आणि पोट कमी होते. यामुळे अन्न पचन पण चांगले होते. जिऱ्याचे पाणी  शरीराला डिटॉक्स करतात. यामुळे त्वचा पण निरोगी राहते.

हे ही वाचा:

अश्या ‘ही’ पद्धतीने बनवता येईल कैरीची चटणी

चॉकलेट,पेस्ट्री खाऊन कंटाळलात ? मग एकदा “चोको मिल्क” ट्राय करुन बघाच

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss